chandrapur Landslide News | भूस्खलन | खासदारांनी तपासला कोळसा खाणीचा नकाशा - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑगस्ट २७, २०२२

chandrapur Landslide News | भूस्खलन | खासदारांनी तपासला कोळसा खाणीचा नकाशा


खासदार बाळू धानोरकर यांनी केली दुर्घटना स्थळाची पाहणी

chandrapur Landslide News | भूस्खलन | 

चंद्रपूर । जिल्ह्यातील घुघुस येथील आमराई वॉर्डांत भूस्खलन झाल्याने एका नागरिकाचे घर जमिनीत गेले. या घटनेची पाहणी करण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट दिली. या भागातील नागरिकांना भविष्यात सुरक्षित जागा मिळावी, यासाठी वेकोलीने त्यांच्या वसाहतीमध्ये सामावून घ्यावे, अशी सूचना देखील यावेळी त्यांनी केली.

घुग्घुस येथील अमराई वार्डात राहणार्‍या श्री. गजानन मडावी यांचे राहते घर काल सायंकाळच्या सुमारास अचानकपणे भुस्खलन होऊन जमिनीखाली गाडल्या गेले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच तातडीने याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. पोलीस प्रशासनाकडून घटनास्थळाजवळचा परीसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिने जवळपास राहणार्‍या अनेक कुटुंबांची व्यवस्था स्थानिक जि. प. शाळेत करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, वेकोली अधिकाऱ्यांसोबत भेट घेणार असून, पुढील उपाययोजनांसंदर्भात चर्चा करेल अशी माहिती खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. यापूर्वी या भागामध्ये अंडरग्राउंड कोळसा खाण होती, ती सीलिंग केल्या गेली. घराशेजारी विहीर असावी. विहिरीचा बोगदा खोलवर असावा, त्यामुळे तो भाग खचला असावा. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्याची गरज आहे. नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि वेकोली अधिकाऱ्यांसोबत बसून, चर्चा करून तोडगा काढून योग्य त्या सूचना करून, पुढील कारवाई केली जाईल, असेही यावेळी खासदाराने सांगितले. 

 #khabarbat #india #india #coal #wcl chandrapur Landslide News | भूस्खलन | 
maharashtras ।  breaking news from maharashtra। breaking news maharashtra । latest news about maharashtra । latest news on maharashtra ।maharashtra news in hindi live । breaking news in maharashtra । breaking news of maharashtra । latest news in maharashtra । mah news । chandrapur maharashtra । chandrapur jilla । maharashtra chandrapur । of chandrapur । chandrapur city । chandrapur in maharashtra । chandrapur india
 । chandrapur ms । chandrapur mh ।  where is chandrapur
Watch video on YouTube here: https://youtu.be/fs-7wWIqXMM