चंद्रपूर शहरात गणरायाची वाजत गाजत मिरवणूक - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, ऑगस्ट २२, २०२२

चंद्रपूर शहरात गणरायाची वाजत गाजत मिरवणूक
गणरायाची मिरवणूक

#khabarbat #chandrapur
काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने गणरायाच्या आगमनाची ओढ लागली आहे. ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. रविवार गांधी चौक परिसरातील मिलन चौकपासून काढण्यात पठाणपुरापर्यत काढलेल्या या मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधले. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून मिरवणूक रद्द करण्यात आली होती. मात्र, यंदा कोरोनाचे संकट बर्‍यापैकी शिथिल झाल्याने आठ दिवस आधीच वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.

काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने गणरायाच्या आगमनाची ओढ लागली आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी गणपतीचे ढोल-ताशांच्या गजरात आगमन झाल्याने, परिसरातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी गणेशभक्तांनी मिरवणुकीचा मनसोक्त आनंद लुटला. रविवार समाधी वॉर्ड, कोतवाली वॉर्ड, पठाणपुरा, बालाजी वॉर्ड परिसरात मिरवणुक निघाली. तर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी गांधी चौक येथे मोठ्या मूर्ती साकारण्यात येत आहेत. ढोल पथकांनी यावेळी केलेल्या ढोल वादनाने परिसर दुमदुमला होता. तसेच यावेळी वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले होते.
Watch video on YouTube here: https://youtu.be/cxzeDTqxVNs