वेकोली परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑगस्ट २७, २०२२

वेकोली परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले


  ्या खाणी लगत असलेल्या घुग्घुस येथील अमराई वार्डात भूस्खलन झाल्याने गजानण मडावी यांचे घर चक्क 60 ते 80 फुट आत गेल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती होताच आमदार किशोर जोरगेवार (kishor Jorgewar) यांनी अधिका-र्यांसह जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-र्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहे. यावेळी नायब तहसीलदार खंडारे, मंडळ अधिकारी नवले, घुग्घुस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुसाटे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. Police

मडावी यांचे अर्ध्यापेक्षा जास्त घर या घटनेत खड्यात गेले आहे. पाहणी दरम्याण आमदार किशोर जोरगेवार (kishor Jorgewar) यांनी जवळपासचा परिसर खाली करण्याचे निर्देश प्रशासनाला केले आहे. सदर नागरिकांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार  (kishor Jorgewar)यांनी प्रशासनाला केल्या आहे. परिसर खाली झाल्यावर येथे चोरी सारख्या घटना घडु शकतात त्यामूळे येथे पोलिस उपलब्ध करुन देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी पोलिस निरिक्षकांना दिले आहे. सदर परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्याच्या सुचनाही त्यांनी महावितरण विभागाला केल्या आहे. सदर घटनेची माहिती वेकोलीचे वणी एरियाचे मुख्य महाप्रबंधक आभासचंद्र सिंग यांना दिली आहे. वेकोलीनेही त्यांच्या सुरक्षा रक्षक व आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला येथे तात्काळ पाचारन करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. घर खड्ड्यात गेल्याने आर्थिक नुकसान झालेल्या कुटुंबाचीही आ. जोरगेवार यांनी भेट घेतली असून पिडीत कुटुंबाला मदत करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या आहेत. #india #khabarbat #live Watch video on YouTube here: https://youtu.be/P6gjp5vMl6I