राजगुरुनगर येथे शहिदांच्या स्वप्नातील भारत India in Martyrs' Dream at Rajgurunagar - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, ऑगस्ट २४, २०२२

राजगुरुनगर येथे शहिदांच्या स्वप्नातील भारत India in Martyrs' Dream at Rajgurunagar

जुन्नर/ आनंद कांबळे
: 24 ऑगस्ट 2022 रोजी राजगुरुनगर येथे होणाऱ्या रोजगार आणि शहिदांच्या स्वप्नातील भारत या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागातून भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ डी वाय एफ आय या संघटनेच्या नेतृत्वाखाली बाईक रॅली व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.


या बाईक रॅलीचे स्वागत जुन्नरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, त्याचबरोबर डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया व एस एफ आय या विद्यार्थी संघटनांच्या वतीने करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी जाहीर सभा झाली.

सध्या देशात व राज्यांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून सरकारी नोकर भरती वेळेवर होत नाहीत. त्यामुळे तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. त्याचबरोबर, सरकारी नोकर भरती वेळेवर होत नसल्यामुळे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असून या असंतोषला वाचा फोडण्यासाठी उद्या 24 तारखेला शहीद राजगुरू यांच्या जन्मदिवशी डी वाय एफ वाय या तरुणांच्या संघटनेने रोजगार हा मुद्दा महत्त्वाचा म्हणून शहिदांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे या मूलभूत प्रश्नावर आवाज उठवला आहे, असे डीवायएफआय राज्य अध्यक्ष व तलासरी पंचायत समिती सभापती नंदू हडाळ म्हणाले.

तसेच, अखिल भारतीय किसान सभा पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जुन्नर तालुका सचिव गणपत घोडे, लक्ष्मण जोशी यांनीही सभेला संबोधित केले.

यावेळी प्रवीण गवारी, किरण हिले, दीपक लाडके, नरेंद्र धिंदळे, अक्षय साबळे, तसेच DYFI ठाणे-पालघर जिल्हा सचिव राजेश दळवी, तलासरी चे नगराध्यक्ष सुरेश भोये, नितीन काकरा, प्रकाश चौधरी, भरत वळंबा, पंचायत समिती सदस्य लाडक लहांगे, भास्कर म्हसे आदीसह मोठ्या संख्येने युवक सहभागी उपस्थित होते.