रतिलाल बाबेल यांना इंडिया एज्युकेशनल राष्ट्रीय पुरस्कार जाहीर - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, ऑगस्ट २२, २०२२

रतिलाल बाबेल यांना इंडिया एज्युकेशनल राष्ट्रीय पुरस्कार जाहीरजुन्नर /आनंद कांबळे
प्रसिद्ध वक्ते ,जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष व गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर ,नारायणगाव येथील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक यांना हाय पेज मीडिया जयपुर (राजस्थान) यांच्या वतीने राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने देण्यात येणारा इंडिया एज्युकेशनल पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती संस्थेचे सीईओ गौरव गौतम यांनी दिली.


रतिलाल बाबेल यांनी विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने शिक्षकांसाठी शैक्षणिक दौऱ्याचे आयोजन ,विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व ,निबंध स्पर्धेचे आयोजन यासारखे उपक्रम राबविले असून पंचायत समिती व जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात ते सक्रिय सहभागी असतात.


ग्रामोन्नती मंडळ नारायणगावच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरात गेली तीस वर्षे ते विज्ञान व गणित अध्यापनाचे कार्य करीत असून उत्तम निकालाची परंपरा त्यांनी कायम राखली आहे .त्यांनी मार्गदर्शन केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनात राष्ट्रीय स्तरावर पारितोषिके मिळाली आहेत.

 शिक्षकांसाठी असणाऱ्या वरिष्ठ श्रेणीसाठी व नवीन अभ्यासक्रमासाठी त्यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून अनेक वर्ष काम पाहिले आहे .आदिवासी भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाबरोबर त्यांनी मोफत मार्गदर्शन केले आहे .पुणे जिल्ह्यात त्यांचा उत्कृष्ट वक्ते म्हणून नावलौकिक आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन हायपेज मीडिया, जयपुर यांनी देशातील शंभर शिक्षकांमध्ये रतिलाल बाबेल यांचा समावेश केला आहे ही जुन्नर तालुक्यातील सर्व विज्ञान व गणित शिक्षकांसाठी अभिमानाची बाब आहे.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी जयपूर या ठिकाणी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या निवडीबद्दल ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे अध्यक्ष प्रकाशमामा पाटे ,कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल तात्या मेहर, सर्व संचालक ,जुन्नर तालुका विज्ञान व गणित शिक्षक यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.