India Book of Records | चंद्रपुरच्या पाण्यातील योग प्रात्यक्षिकांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली दखल I - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, ऑगस्ट २६, २०२२

India Book of Records | चंद्रपुरच्या पाण्यातील योग प्रात्यक्षिकांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली दखल I

 इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे चंद्रपुरात प्रथमच पाण्यातील योग प्रात्यक्षिकांचे आयोजन


 "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड"  या संस्थेच्या वतीने येत्या 28 ऑगस्ट 2022,  रविवार ला सकाळी दहा वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे पाण्यातील योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.  चंद्रपूर मधील 85 वर्षीय जलयोग साधक कृष्णाजी नागपुरे यांच्या पाण्यातील योग प्रात्यक्षिकांची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या संस्थेने घेतली आहे. India Book of Records


कृष्णाजी नागपुरे हे पाण्यात विविध प्रकारचे योगआसने करीत असतात. पाण्यात पद्मासन,  गोरक्षासन,  सुप्त भद्रासन,  शवासन,  सिद्धासन,  अशी विविध प्रकारची योगासने आणि मुद्रा तसेच Yog विविध प्रकार यांची अनेक प्रात्यक्षिके कृष्णाजी नागपुरे यांनी यापूर्वी चंद्रपूर करांना करून दाखविले आहेत.   त्यांच्या या कार्याची दखल घेत 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' या संस्थेने त्यांचे  न्यायाधीश प्रतिनिधी चंद्रपूरला पाठविले आहेत,  या प्रतिनिधींच्या पुढे त्यांच्या पाण्यातील विविध योगासनांची प्रात्यक्षिके येत्या रविवारी  केली जाणार आहेत.  चंद्रपूर मधील लोकप्रतिनिधी,  जिल्हा क्रीडा अधिकारी,  आणि नागरिकांच्या उपस्थितीत यशस्वी प्रात्यक्षिकांच्या नंतर कृष्णाजी नागपुरे यांचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवले जाणार आहे.  चंद्रपूर करांनी  येत्या रविवारी  या  प्रात्यक्षिक कार्यक्रमाला उपस्थित रहावे अशा प्रकारचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

India Book of Records took note of the yoga demonstrations in the waters of ChandrapurYoga is a group of physical, mental, and spiritual practices or disciplines which originated in ancient India and aim to control