Local wildlife News | अखेर तो बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, ऑगस्ट २५, २०२२

Local wildlife News | अखेर तो बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

अखेर बिबट्या जेरबंद


गावक-यानी घेतला सुटकेचा निश्व्वास
चंद्रपुर:-बलारपुर वन परिक्षेत्रातील विसापुर हद्दीतील जुन्या पावर हाऊस केंद्राच्या पडक्या वसाहतीत मागिल दोन महिन्या पासुन बिबट्याची दहशत होती त्यानी या परिसरात येना-या पसुधनाची शिकार ही केली.परंतू तो या परिसरात न थांबता विसापुर गावात जावुन कुत्र्यांची शिकार करित वार्ड़ पाच मध्ये धुमाकूळ घातला व प्रल्हाद मशाखेत्री यांची बकरी ठार केली.त्यामूळे या बिबट्याची दहशत अधिकच वाढली .वनविभागाने वरिष्ठांची परवानगी घेत दोन दिवसात चार पिंजरे परिसरात लावले बाॅटनिकल गार्डन नजीक दोन पिंज-यापैकी एका पिंज-यात जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले व जनतेननी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
जुना पावर हाऊस च्या अंदाजे शंभर एकर क्षेत्रातील काही भागात जुन्या पड्क्या वसाहतिच्या इमारती चार दीवारीच्या आधारे उभ्या आहेत या परिसरात झुडपी जंगल मोठ मोठे वृक्ष असल्याने बिबट्यांने या क्षेत्रात आसरा घेतला.परिसरात येणारी कुत्रे,बक-या ,वासरू यांची शिकार करु लागला ,तसेच विसापुरची बरीच जनता कामानिमित्य याच मार्गाचा अवलंब करीत ये-जा करीत असतात. हाच मार्ग सोईस्कर असल्याने दिवस रात्र या मार्गाची वरदळ आजही नियमित सुरु आहे.या मार्गावर अनेकाना बिबट्याचे दर्शन होवू लागले त्यामुळे येथिल जनतेत भितिचे वातावरण निर्माण होवू लागले.अशातच विसापुर गावात जावुन कुत्रे,बकरी ची शिकार ही करु लागल्याने जनतेत अधिक भितिचे वातावरण निर्माण झाले. कोणतीही जिवित हाणी होवू नये या करीता गावक-यानी वनविभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली.या मागणीची द्खल घेवुन मध्य चांदा वनविभाग चंद्रपुर च्या उपवनसंरक्षक श्वेता बोडु यांनी शासनाकडे बिबट जेरबंद करण्याची परवानगी मागितली परवानगी मिळताच बिबट जेरबंद करण्याचे निर्देश बल्लारपुर वनपरीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांना दिले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मध्य चांदा वन विभागातील बल्लारशहा वन विभागाची रेस्क्यू पथक सक्रिय झाले.यासाठी वनविभागाने बिबट्याची हालचाल टीपण्या साठी चार ठिकाणी ट्रयाप कॅमेरे व चार ठिकाणी पिंजरे लावले होते. बुधवार दिनांक २४ ला सांयकाळी ८.३०च्या दरम्यान बिबट जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. व गावक-यानी सुटकेचा निश्वास सोडला.leopard


ही कार्यवाही मध्य चांदा वनविभाग चंद्रपुर च्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्ड यांच्या मार्गदर्शनात विभागीय वन अधिकारी सुहास बडेकर यांच्या नेतृत्वात मानद वन्य जीव रक्षक बंडू धोत्रे, सहायक वन संरक्षक श्रीकांत पवार,व्याघ्र वन्य जीव रक्षक मुकेश भांधककर,बल्लारपुर वन परीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे,पशुधन विकास अधिकारी डाॅ.दिलीप जांभुळे यांच्या मार्फत करण्यात आली. या प्रसंगी वनक्षेत्र सहायक अधिकारी कोमल गुगलोत,वनरक्षक अमित चहांदे,व वनकर्मचारी यांनी सहकार्य केले.

Eco pro leopard wildlife forest official website forest Mumbai ballarpur Sudhir mungantiwar