चंद्रपूर शहर महापालिकांच्या सदस्य संख्येत पुन्हा सुधारणा #Election2022 - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०३ ऑगस्ट २०२२

चंद्रपूर शहर महापालिकांच्या सदस्य संख्येत पुन्हा सुधारणा #Election2022 


चंद्रपूर, महाराष्ट्र, भारत

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (State Cabinet Meeting) आज महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे चंद्रपूर (चंद्रपूर, महाराष्ट्र, भारत) शहर महापालिकांच्या सदस्य संख्येत पुन्हा सुधारणा होईल.  लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्येत सुधारणा होणार आहे. त्यानुसार 3 लाखांपेक्षा अधिक व 6 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या 65 इतकी तर कमाल संख्या 85 इतकी असेल.


राज्य सरकारने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिकांच्या निवडणुकांसाठी 2017 साली जी प्रभाग रचना होती तीच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  

जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा परिषदेतदेखील बदल होईल. 


या बैठकीत महापालिका निवडणुकीत (Election 2022) नवी वॉर्डर रचना तयार करण्यात आली होती. ती वॉर्ड रचना रद्द केल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. तसेच 2017 मध्ये ज्या वॉर्डरचनेप्रमाणे निवडणुका झाल्या होत्या. त्याच वॉर्ड रचनेप्रमाणे यंदाही निवडणूक घेण्याचा सरकारचा विचार असल्याचे समजते. या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यास हा महाविकास आघाडीसाठी आणखी एक मोठा धक्का ठरु शकतो.


-----

------------

#election #election2016 #electionday #elections #selection #election2019 #theselection #summersunselection #presidentialelection #inaelectionobserversos #election2018 #fashionselection #joinmyselection #election2020 #tattooselection #indonesiaelection #chefselection #2016election #midtermelections #selectionrp #02wintheelection #2020election #naturalselection #generalelection #election2012 #pixelection #loksabhaelections2019 #officialselection #electionnight #2019elections #electionday2016 #saintselection #elections2016 #theselectionseries #casadiringhieraselection #elections2018 #massivefraudelection #selections #uselection #election2017