नवे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पदभार स्वीकारला | Dr. Vipin Itankar-Nagpur - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, ऑगस्ट १९, २०२२

नवे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पदभार स्वीकारला | Dr. Vipin Itankar-Nagpurनागपूर : नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विपीन इटनकर (Dr. Vipin Itankar) यांनी आज मावळत्या जिल्हाधिकारी आर. विमला (R. Vimala) यांच्याकडून सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पद पदभार स्वीकारला.

मावळत्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर नवे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आर. विमला यांना पुणे येथे बाल कल्याण विभागात आयुक्त पदावर नियुक्तीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. विपीन इटनकर हे नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. ते मुळचे चंद्रपूर येथील असून 2014 च्या तुकडीचे आय.ए.एस. अधिकारी आहे. यु.पी.एस.सी. परीक्षेमध्ये राज्यातून प्रथम तर देशातून चौदावा क्रमांक मिळविला होता. त्यांनी नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. केले आहे.