ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांच्यासंदर्भातील महत्वाची अपडेट | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, ऑगस्ट २५, २०२२

ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांच्यासंदर्भातील महत्वाची अपडेट |गेली अडीच महिने पुण्यात Dinanath Mangeshkar Hospital येथे कॅन्सर वरील उपचार घेऊन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे (Dr. Prakash Atme) यांची तब्येत आता सुधारली आहे. 5 केमोथेरपी ने काम केले आहे. आज हाताचे प्लॅस्टर काढले. केमोथेरपी सुरू असतांनाच खोलीत अडखळून पडल्याने मनगट फ्रॅक्चर झाले होते. त्याला आज दीड महिना झाला म्हणून प्लॅस्टर काढले. आज दवाखान्यात डॉक्टरांनी फॉलोअप साठी बोलावले होते. समाधानकारक सुधारणा असल्याने येत्या शुक्रवारी डॉक्टरांनी नागपूरला जायची परवानगी दिली आहे. तो आनंद वेगळा आहे, अशी पोस्ट पुत्र अनिकेत यांनी फेसबुकवर लिहली आहे.


मधले काही दिवस त्यांच्यासाठी आणि आमच्या साठी अतिशय खडतर गेले. 2 महिने सलग ताप आणि न्युमोनिया मुळे 9 किलो वजन कमी झाले आहे. असा कुठल्याही प्रकारचा कॅन्सर सारखा भयंकर आजार कोणालाही होऊ नये अशी निसर्गाला प्रार्थना करतो.
DMH मधील डॉक्टरांचे अथक प्रयत्न, तेवढ्याच प्रेमाने नर्स आणि स्टाफ यांनी केलेली सेवा आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा याच मुळे बाबा बरे होत आहेत. कुठल्याही इन्फेक्शनचा धोका होऊ नये म्हणून सध्या गर्दी टाळावी असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पुढील काही दिवसांनी डॉक्टरांच्या परवानगीने बाबा सर्वांना भेटू शकतील. आम्ही सर्व कुटुंबीय आपले खूप खूप आभारी आहोत.
पुण्यात 75 दिवस वास्तव्य असताना अनेकांनी विविध मार्गाने सहकार्य केले. लोभ असावा असाच कायम, असेही अनिकेत आमटे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 🙏🏻 Dinanath Mangeshkar Hospital Dr. Prakash Atme