मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडली; उपमुख्यमंत्री तातडीने दिल्लीला रवाना | - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

गुरुवार, ऑगस्ट ०४, २०२२

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडली; उपमुख्यमंत्री तातडीने दिल्लीला रवाना |

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडली; उपमुख्यमंत्री तातडीने दिल्लीला रवाना 


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांची प्रकृती अचानक बिघडली. सततचे दौरे, सभा, कार्यक्रम यामुळे एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवत असल्याची माहिती  आहे. डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली असल्याने सर्व प्रशासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे त्यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करुन दिल्लीला रवाना झालेत. आज दिल्लीमध्ये ते भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. फडणवीस यांच्या या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

#devendrafadnavis #eknathshinde #महाराष्ट्र  #मुंबई