२८ ऑगस्ट रोजी तान्हा पोळा; नंदी बैल विक्रीस - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, ऑगस्ट २४, २०२२

२८ ऑगस्ट रोजी तान्हा पोळा; नंदी बैल विक्रीस

https://www.khabarbat.in/

chandrapur| wooden bull  | demand tanha pola | market

वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. श्रावण अमावास्येला पोळा साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. लहान मुले मोठे बैल नेऊ शकत नाहीत. ते त्यांना आवरूपण शकत नाहीत. म्हणून त्यांच्या हौस-मजेसाठी तान्हा पोळा' साजरा करण्यात येतो. त्या दिवशी, लहान मुले लाकडापासून तयार केलेला बैल घेऊन खऱ्या बैलाप्रमाणेच या लाकडाच्या बैलाचा तान्हा पोळा साजरा करतात. यंदा हा सण २८ ऑगस्ट रोजी साजरा होत असून, त्यासाठी नंदी बैल विक्रीस आली आहेत. चंद्रपूर शहरातील गांधी चौक, महानगरपालिका परिसर येथे बाजार भरला आहे. 

 :festivalBail pola Festivalpola Festival Celebration festival season

वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण अर्थात पोळा दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, कोरोना नंतर आता दोन वर्षानंतर सर्व सण उत्सव उत्साहात साजरे केले जात आहेत. बैलाच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे बाजारात विक्रीस आली आहेत.


culture-and-religion/bail-pola-2022-tithi-or-date-and-importance-decoration