पोलिसांनी केली काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

शुक्रवार, ऑगस्ट ०५, २०२२

पोलिसांनी केली काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केंद्र सरकारविरोधात आज काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जिल्ह्यामध्येही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली.  महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध विषयांवर आज चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले होते.  यावेळी शहर अध्यक्ष रामू तिवारी, शहर अध्यक्ष Sangita Amrutkar, राजेश अडूर, प्रशांत Bharati, सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सध्या देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. इंधनाच्या किंमती दररोज वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. या महागाई विरोधात काँग्रेसने देशभर आंदोलन करण्याची घोषणा केली होती. दरम्यान या आवाहनानुसार आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे सह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरुध्द घोषणाबाजी करीत परीसर दणाणून सोडला. 


#Congress

सर्वसामान्य नागरीकांना रोज लागणा-या आवश्यक वस्तुंवर सुध्दा जीएसटी लावण्यात आल्याने खादयपदार्थांची दरवाढ झाली आहे. या भाववाढीने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले असले तरी सरकार मात्र दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे कॉग्रेसने आज देशभर आंदोलन केले सरकारच्या या तुघलकी निर्णयांच्या विरोधात अखेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला. आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 


The Indian National Congress