५२० रुपये मजुरीऐवजी केवळ ३०० रुपये | - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

बुधवार, ऑगस्ट ०३, २०२२

५२० रुपये मजुरीऐवजी केवळ ३०० रुपये |

उद्यानात देखभाल करणाऱ्या कंत्राटदाराकडून मजुरांची लूट 


कारवाईसाठी आम आदमी पार्टीने दिला ५ दिवसाचा अल्टिमेटम 


चंद्रपूर । शहरातील मनपा अंतर्गत येणाऱ्या उद्यानात देखभाल करणाऱ्या कामगारांना प्रतिदिवस ५२० रुपये मजुरी देण्याची तरदूत असतानाही संबंधित ठेकेदाराकडून मागील काही वर्षांपासून पिळवणूक केली जात आहे. चंद्रपूर स्वच्छता सामाजिक मंडळाच्या नावाखाली माजी नगरसेविकेचे पतीच पडद्यामागून ठेवा चालवीत असून, मजुरांना केवळ ३०० रुपये रोजी देऊन पिळवणूक केली जात आहे. या संदर्भात तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे. 


चंद्रपूर शहरातील महानगरपालिकेच्या उद्यानांची देखभाल करणे, पाणी टाकणे, लॉन आणि झाडाकरिता माती, कचरा साफ करणे, निंदण करणे आदी कामासाठी २०२० मध्ये चंद्रपूर स्वच्छता सामाजिक मंडळाला कंत्राट देण्यात आले. मनुष्यबळाचा पुरवठा करून त्यांच्या कडून काम करवून घेण्याची जबाबदारी या मंडळाकडे आहे. त्यासाठी प्रतिमजूर प्रति दिवस ५२० रुपये मजुरीची तरतूद करण्यात आली. चंद्रपूर स्वच्छता सामाजिक मंडळाचे अप्रत्यक्ष काम बाबुपेठ भागातील माजी नगरसेविकेचे पती बघतात. बहुतेक उद्यानातील कामाचे कंत्राट त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे मजूर देखील हे बाबुपेठ प्रभागातील डॉ. आंबेडकर नगरचे रहिवासी आहेत. मात्र, या कामापोटी ५२० रुपयांऐवजी केवळ ३०० रुपये दिले जात आहे, अशी तक्रार आपचे शहर सचिव राजू शंकरराव कूडे यांच्याकडे प्राप्त झाली. संबधित ठेकेदार एवढ्यावरच न थांबता लागणारे साहित्य हे सुध्दा कामगारांना स्व: खर्चाने आणायला लावत आहे. पीएफ खात्यात भरावयाची रक्कम सुध्दा कमी टाकून कामगाराचे शोषण केले जात आहे. आपचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे यांनी यासंदर्भात मनपा आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. येत्या 5 दिवसात पीडित कामगाराचे वेतन त्यांचा खात्यात टाका, अन्यथा संबधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कामगाराच्या हक्क अधिकार अधिनियम अंतर्गत कायदेशिर कारवाई आपतर्फे करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळेस आपचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे, शहर सचिव राजू  कुडे, झोन 3 सह संयोजक अजय कुमार बाथव, झोन 3 सचिव विनोद रेब्बावार, बाबूपेठ संयोजक अनुप तेलतुंबडे, महेश ननावरे, वार्ड अध्यक्ष रुपम ताकसांडे, संदीप रायपूरे, मोठया संख्येने सफाई कामगार आणि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

 #Chandrapur