चंद्रपूर: दूषित पाणी पिल्याने ४ गावकऱ्यांचा मृत्यू; 97 नागरिकांना गॅस्ट्रोची लागण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०६ ऑगस्ट २०२२

चंद्रपूर: दूषित पाणी पिल्याने ४ गावकऱ्यांचा मृत्यू; 97 नागरिकांना गॅस्ट्रोची लागण

drinking contaminated water
चंद्रपूर | जिल्ह्यात अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 
drinking contaminated water चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील देवाडा गावात दूषित पाणी प्यायल्याने ४ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची दुःखद घटना घडली आहे. अनिशा शेख (वय २५), सोमा शेंडे (वय ५५ ) आणि लक्ष्मी मंचकटलावार (वय ५०) या व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. shocking incident 

तर यातील तीन गावकऱ्यांचा जीव हा प्राथमिक आरोग्य केंद्रात तर एकाच जीव हा घरीच गेला असल्याचे सांगण्यात येत आहे, जवळपास ९७ रुग्ण हे जिल्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहे,गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांनी पूर्णपणे भरलं आहे. Health Center

माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर (Hansraj Ahir) यांनी गावात व रुग्णालयात भेट दिली आणि परिस्थीती जाणून घेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला जवाबदार असल्याचे म्हटले आहे, लवकरच याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. 

गावात नळयोजनेद्वारे होणारा दूषित पाण्याचा पुरवठा यामुळे गावकऱ्यांना अतिसाराची लागण झाल्याचं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे. गावातील नळयोजनेचे व्हॉल्व्ह खड्ड्यात आहेत. त्याठिकाणी सांडपाणी जमा झाले आणि तेच पाणी नळामार्फत नागरिकांना पुरवले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. 


राजुरा, महाराष्ट्र 442905, भारत
Devada | Rajura | Chandrapur | drinking contaminated water | Anisha Sheikh (age 25), Soma Shende (age 55) and Lakshmi Manchakatlawar (age 50) 

Anne Heche | Kim Kardashian | Premier League | The Sandman
Diego Bertie | Thirteen Lives | What is monkeypox | Tiger Woods
Conor McGregor | Ezra Miller