शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक | ईडी विरोधात घोषणाबाजी | #Chandrapur #Shivsena - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०३ ऑगस्ट २०२२

शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक | ईडी विरोधात घोषणाबाजी | #Chandrapur #Shivsenaशिवसेनेचे (Shivsena) खा. संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर ईडीचे कारवाई (ED) सुरू झाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर मध्ये  देखील शिवसेनेच्या वतीने जटपुरा गेटसमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी ईडी विरोधात घोषणाबाजी करण्यात येऊन कारवाई मागे घेण्याची मागणी यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. 


यावेळी जिल्हाप्रमुख संदीप गिरे  भाजपावर टीका करताना म्हटले की, ईडी सारख्या यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. खासदार राऊत यांनी उसने पैसे घेतल्याचे कारण पुढे करून त्यांना अटकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. खासदार राऊत यांना चुकीच्या पद्धतीने ईडीच्या माध्यमातून गुंतवण्याचे षडयंत्र आखण्यात आले आहे. या सर्व प्रकारामागे भाजपाचा हात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी उज्वला नलगे, प्रमोद पाटील, सुरेश पचारे यांच्यासह कार्यकत्यांची उप्शीतीत होती.