कृषी सहाय्यक व व झेरॉक्स व्यावसायिकास लाच घेताना पकडले - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

शुक्रवार, ऑगस्ट ०५, २०२२

कृषी सहाय्यक व व झेरॉक्स व्यावसायिकास लाच घेताना पकडले

कृषी सहाय्यक व व झेरॉक्स व्यावसायिकास लाच घेताना पकडले 


पोवनी ता . राजुरा जि . चंद्रपुर येथील रहीवासी नागरिकाने आपले सरकार पोर्टल या प्रणालीवर जुने ०४ कृषी केंद्र विक्री परवाने अपडेट करुन , ०१ नविन परवाना काढुन व सर्व कृषी केंद्र परवाने स्थालांतर करुन देण्यासाठी अर्ज केला. या कामाकरीता कृषी अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय चंद्रपुर येथील श्रीमती जया विजय व्यवहारे , ( कृषी सहय्यक ) यांनी दि . ०४/०८/२०२२ रोजी तक्रारदाराकडे १०,००० / - रु . ची मागणी केली. आज दिनांक ०५/०८/२०२२ रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाहीदरम्यान श्रीमती जया विजय व्यवहारे, (कृषी सहय्यक ) यांनी तक्रारदाराकडे १०,००० / - रु . लाचेची मागणी करुन राजुरा येथील वैभव विजय धोटे ( गनपती कम्युनीकेशन आणि झेरॉक्स सेंटर) यांच्या मार्फतीने स्वीकारली. chandrapur anti corruption

याप्रकरणी जया विजय व्यवहारे, (कृषी सहय्यक) व वैभव विजय धोटे ( गणपती कम्युनीकेशन आणि झेरॉक्स सेंटर ) यांना रंगेहाथ पकडण्यात आले तसेच श्रीमती जया विजय व्यवहारे, (कृषी सहय्यक) यांना कृषी अधिक्षक , कृषि अधिकारी कार्यालय चंद्रपुर या कार्यालयामधुन ताब्यात घेण्यात आलेले आहे.  पुढील तपास कार्य सुरु आहे. 

 Rajura chandrapur job vacancy 2022