चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे ‘ स्पर्धा पुरस्कार“ वितरित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०३ ऑगस्ट २०२२

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे ‘ स्पर्धा पुरस्कार“ वितरित
चंद्रपूर | श्रमिक पत्रकार संघातर्फे दिल्या जाणा-या स्पर्धा पुरस्कारांचे वितरण आमदार सुधीर मुगणतीवर आणि माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. श्रमिक पत्रकार भवनात हा सोहळा पार पडला. यावेळी संघाचे अध्यक्ष मजहर आली यांची उपस्थितीती होती. 

मान्यवय्राच्या हस्ते   ‘जीवनगौरव पुरस्कार ‘ ज्येष्ठ पत्रकार सुनिल देशपांडे,तर“कर्मवीर पुरस्कार ‘ बाळ हुनगूंद व प्रा.यशवंत मुल्लेमवार यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

ग्रामीण वार्ता पुरस्कारांचे प्रथम मानकरी विकास खोब्रागड़े, व्दितीय- गणेश लोंढे, तृतीय प्रशांत डांगे, प्रोत्साहनपर पुरस्कार यामर बुद्धपवार, राजकुमार चुनारकर, ‘मानवी स्वारस्य अभिरुची पुरस्कार‘ साईनाथ कुचनकार, शुभवार्ता पुरस्कारासाठी साईनाथ सोनटक्के,  छायाचित्र स्पर्धा  पुरस्कार कु. प्रियंका पुनवटकर, उत्कृष्ट वृत्तांकन (टि.व्ही) पुरस्कार अनवर शेख, ‘डिजिटल मीडिया शोध पत्रकारिता पुरस्कार ‘ प्रथम प्रकाश हांडे आणि व्दितीय पुरस्कार विजय सिद्धावार यांचा सत्कार करण्यात आला. 

 सर्व पुरस्कार विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच यावेळी  #Chandrapur #pressclub

विविध स्पर्धा पुरस्काराचे परिक्षण जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर,प्रा.योगेश दुधपचारे आणि सामाजिक कार्यकर्ते बंडु धोतरे यांनी केले. अशी माहिती स्पर्धा संयोजक रमेश कल्लेपेल्ली, योगेश चिंधालोरे, कमलेश सातपुते, देवानंद साखरकर व राजेश निचकोल यांनी प्रसिध्द पत्रकातून दिली आहे.  #Chandrapur #pressclub