Chandrapur News | Anchaleshwar temple अंचलेश्वर मंदिराचे होणार सौदर्यीकरण - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, ऑगस्ट १९, २०२२

Chandrapur News | Anchaleshwar temple अंचलेश्वर मंदिराचे होणार सौदर्यीकरण

Chandrapur News |  अंचलेश्वर मंदिर ही गोंड कालीन पुरातन वास्तु आहे. याचे जतन येथील नागरिकांनी केले आहे. असे असतांनाही येथील अनेक भागांची पडझड झाली आहे. मात्र पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या प्रसाद योजने अंतर्गत या मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे अंचलेश्वर मंदिराला प्राप्त होणार असलेले हे नवे रुप गोंड कालीन वास्तुच्या सौंदर्यात भर पाडणारे ठरावे अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-र्यांना केल्या आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल कुंभे, उप विभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार यांच्यासह संबधित उधिका-र्यांची उपस्थिती होती. Anchaleshwar temple | structure of Gond period

केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालय विभागाच्या वतीने प्रसाद योजने अंतर्गत अंचलेश्वर मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. यासाठी 40 कोटी रुपयांचा प्रस्ताव सार्वजनिक विभागाच्या वतीने संबधित विभागाला पाठविल्या जाणार आहे. अंचलेश्वर मंदिर हे प्राचीन आहे. येथे प्राचीनकाळी शिवलिंग स्थापित आहे. हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या मंदीराचे विशेष महत्व आहे.

दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-र्यांसह सदर मंदिराची पाहणी करत भाविक आणि भक्तांच्या सूचना जाणून घेतल्या. यावेळी आलेल्या महत्वांच्या सुचनांची दखल घेतल्या जाईल असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केले. येथे भव्य प्रवेश गेट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांसाठी पाय धुण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह या सह इतर कामे केल्या जाणार आहे.गोंड राजे विरशाह आणि राणी हिराई यांच्या समाधी स्थळ असलेली जागा ही आ़त्राम कुटुबींयांच्या नावावर असल्याने येथे बांधकाम करण्यासाठी सदर कुटुबींयाचे नाहरकत प्रमाणपत्र लागणार आहे. ही बाब लक्षात घेता आमदार किशोर जोरगेवार यांनी आत्राम कुटुंबीयांनाही बोलाउन येथे सौंदर्यीकरण करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. आत्राम कुटुंबीयांनीही याला सहमती दर्शवीली आहे. त्यामुळे सदर समाधी स्थळीही आता सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थिती भाविक आणि नागरिकांनीही अनेक महत्वाच्या सुचना केल्या आहेत. मंदिराची छत गळत असल्याने येथे धोका निर्माण झाला आहे. तसेच येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचे यावेळी भाविकांनी सांगीतले. यावर आमदार निधीतून तात्काळ उपायोजना करत मंदिराची छत आणि पाण्याची व्यवस्था करण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-र्यांना केल्या आहे. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सलिम शेख, युवा नेते अमोल शेंडे, सविता दंडारे, शमा काजी, दुर्गा वैरागडे, सतनामसिंह मीरधा, विमल काटकर, विजया बच्छाव, शमा काजी, विलास वनकर, करणसिंह बैस, यांच्यासह मंदिर प्रशासन, भाविक आणि स्थानिक नागरिकांची उपस्थीती होती.