विधानसभेत मांडला चंद्रपूर मनपा हद्दवाढीचा मुद्दा | Chandrapur Municipal Corporation - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, ऑगस्ट २३, २०२२

विधानसभेत मांडला चंद्रपूर मनपा हद्दवाढीचा मुद्दा | Chandrapur Municipal Corporation


चंद्रपूर । महानगरपालिका ही मोठी महानगरपालिका आहे. परंतु चंद्रपूरच्या परिसरातील गावांचा महानगरपालिकेमध्ये समावेश व्हावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत केली . 

चंद्रपूर महानगरपालिकेची हद्द वाढ करणे अत्यंत आवश्यक आहे . ऊर्जानगर, दुर्गापुर या सर्व भागातले लोक या इंडस्ट्रियल एरियामध्ये राहतात.  कारखान्यांमध्ये काम करणारे लोक आहेत. परंतु त्यांचा त्या ठिकाणी महानगरपालिका मध्ये समावेश होऊन विकास झाला पाहिजे. 
चंद्रपूर महानगरपालिकेची हद्द वाढ करून चंद्रपूरच्या जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. 
चंद्रपूर शहरालगत असलेल्या आरवट, मोरवा, चिंचाळा, खुटाळा, दुर्गापुर हे गावे महानगर पालिकेत येत नसल्याने या गावांचा अपेक्षीत असा विकास करता आलेला नाही. त्यामुळे महानगरपालिका हद्दवाढ करुन सदर गावांचा महानगर पालिकेत समावेश करण्यात यावा, आमदार किशोर जोरगेवार यांनी  


मुंबईत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी पुरवनी मागणीवर बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदार संघातील महत्वाच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले असुन घुग्घुस आणि दिक्षाभुमीच्या विकासासाठी निधीची मागणी केली आहे.

मंबई येथे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशाच्या तिस-या दिवशी चंद्रपूर मतदार संघातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार संघातील महत्वाचे विषय सभागृहात मांडले. यावेळी ते म्हणाले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दोन ठिकाणी दिक्षा देण्याचा कार्यक्रम घेतला होता. त्यातील एक दिक्षाभुमी नागपूरला आणि दुसरी चंद्रपूरला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नागपूर येथील दिक्षाभुमीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. परंतु चंद्रपूरच्या दिक्षाभुमीचा विकास मात्र झालेला नाही. त्यामुळे कमीत कमी ५० कोटी रुपये तरी शासनाने या दिक्षामुमीच्या विकासाकरिता द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी बोलतांना केली. स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष सुरु आहे. ७५ वे वर्ष सुरु असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाचे एक सुंदर संविधान भवन चंद्रपूरमध्ये व्हावे अशी पुर्व विदर्भातील जनतेची भावना आहे. त्यामुळे येथे संविधान भवन निर्माण करण्यात यावे अशी मागणीही यावेळी बोलतांना त्यांनी केली आहे. 

५० हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतीची नगर पालिका झाली. आता येथे काही प्रश्न आहेत. नगर पलिकेच्या कामकाजाला साजेल अशी सोयी सुविधायुक्त नवीन ईमारत येथे तयार करण्याची गरज आहे. त्यामुळे या ईमारती करिता व घुग्घुसच्या विकासाकरिता भरिव निधी द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. घुग्घुस येथुन जात असलेल्या बल्लारशाह - यवतमाळ मार्गाला घुघुस येथे वळण रस्ता देण्यात यावा. चंद्रपूर येथे महानगर पालिका आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णालय सुरु करण्यात यावे आदि मागण्यांकडे योवळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. चंद्रपूरातील प्रमुख मार्गांसाठी नगर विकास विभागाने पहिल्यांदा एकत्रीतपणे २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आभार मानले आहे.

The Chandrapur City Municipal Corporation is the governing body of the city of Chandrapur in the Indian state of Maharashtra.