माता महाकालीची ८० फुट उंच मुर्ती | ६० कोटी रू. किेंमतीच्‍या विकास प्रकल्‍पाला लवकरच सुरूवात होणार | #Chandrapur #Mahakali - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

बुधवार, ऑगस्ट ०३, २०२२

माता महाकालीची ८० फुट उंच मुर्ती | ६० कोटी रू. किेंमतीच्‍या विकास प्रकल्‍पाला लवकरच सुरूवात होणार | #Chandrapur #Mahakali

माता महाकाली मंदीर परिसराच्‍या विकास कार्याची निविदा त्‍वरीत प्रकाशित करावी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश


६० कोटी रू. किेंमतीच्‍या विकास प्रकल्‍पाला लवकरच सुरूवात होणार


चंद्रपूरचे आराध्‍य दैवत माता महाकाली मंदीराशी संबंधित विकासकामांबाबतची निविदा त्‍वरीत प्रकाशित करावी व लवकरात लवकर कामाला सुरूवात करावी, असे निर्देश माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या अधिका-यांना दिले.


आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात श्री महाकाली मंदीर देवस्‍थान परिसराच्‍या विकासासाठी ६० कोटी रू. निधी मंजूर करविला. गोंडकालीन इतिहासाची साक्ष्‍य देणा-या विदर्भातील अष्‍टशक्‍तीपिठांपैकी एक असलेल्‍या श्री महाकाली मंदीर परिसराच्‍या विकासासाठी दिनांक १९ सप्‍टेंबर २०१९ च्‍या नगरविकास विभागाच्‍या शासन निर्णयान्‍वये मान्‍यता देण्‍यात आली आहे. महाकाली मंदीर विकास कार्यक्रमाअंतर्गत गोंडकालीन स्‍थापत्‍य व शिल्‍पकला जपून त्‍याचाच आधार घेवून दोन टप्‍प्‍यात विकास आराखडा तयार करण्‍यात आला आहे. टप्‍पा-१ अंतर्गत धर्मशाळा इमारत, स्‍वयंपाक घर, भाविकांसाठी दर्शन रांगा, दुकाने, मुख्‍य प्रवेशद्वाराचे बांधकाम, फ्लॅग पोस्‍ट, मंडप परिसराचा विकास, मुख्‍य प्रवेशद्वारावर शिल्‍पकला तयार करणे, संरक्षण भिंत तसेच अस्‍तीत्‍वात सोयीसुविधांची पुर्नबांधणी करणे या गोंष्‍टींचा अंतर्भाव टप्‍पा १ मध्‍ये आहे. यासाठी मंजूर ६० कोटी रु निधी डिपॉझिट झाले असल्याने कामामध्ये कोणतीही अडचण येणार नाही


टप्‍पा –२ अंतर्गत अतिविशिष्‍ट व्‍यक्‍तींकरिता प्रवेशद्वार, माता महाकालीची ८० फुट उंच मुर्ती, दिपस्‍तंभ, संग्रहालय, घाट परिसराचा विकास, मनोरे, मंदीर परिसराचा विकास याबाबींचा समावेश आहे.


आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री पदाच्‍या काळात चंद्रपूरच्‍या या आराध्‍य दैवताच्‍या मंदिर परिसराच्‍या विकासासाठी घेतलेला पुढाकार आता मुर्त स्‍वरूपात साकार होत आहे. लवकरच या कामाची निविदा प्रकाशित होणार असून चंद्रपूरकरांच्‍या श्रध्‍देशी निगडीत हा प्रकल्‍प मार्गी लागणार आहे.