Chandrapur Local Breaking News | कोळसा चोरी करताना ट्रकच्या चाकाखाली तरुण चिरडला - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, ऑगस्ट २५, २०२२

Chandrapur Local Breaking News | कोळसा चोरी करताना ट्रकच्या चाकाखाली तरुण चिरडला

कोळशाची चोरी करण्यासाठी ट्रकवर चढलेल्या तरुणाचा खाली पडल्यानंतर ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सात वाजताच्या सुमारास चंद्रपूर शहरातील लालपेठ भागात असलेल्या नांदगाव रोड जंगल छावणी येथे घडली.  coal theft


चंद्रपूर (Chandrapur) शहरालगत असलेल्या नांदगाव, लालपेठ, माना या भूमिगत आणि खुल्या कोळसा खाणीतून ट्रकमध्ये कोळसा वाहून नेला जातो. जेव्हा हे ट्रक कोळसा खानीतून बाहेर निघतात, तेव्हा काही तरुण कोळशाची चोरी करण्यासाठी ट्रकवर चढतात आणि कोळसा खाली फेकतात. साठ रुपये बोरीप्रमाणे हा कोळसा स्थानिक दलाला विकला जातो. यातून त्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत आहे.  | coal theft

मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून, याला कोणीही आत्तापर्यंत विरोध केलेला नाही किंवा तक्रार देखील दिलेली नाही. मात्र आज सकाळी खाणीतून कोळसा भरून निघालेल्या ट्रकवर वीस ते पंचवीस वर्षाचा बल्ली (Balli) तरुण चढला आणि कोळसा चोरत असताना तो खाली पडला. त्यादरम्यान त्याच्या अंगावरून ट्रकचा गेला आणि त्याचा त्यात चेंदामेंदा झाला. दरम्यान या घटनेची तक्रार कुठेही अद्याप पर्यंत देण्यात आलेली नाही. त्याचा मृतदेह थेट घरी नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  coal theft