चंद्रपुरात सेवानिवृत्त सैनिकाची मिरवणूक - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

शुक्रवार, ऑगस्ट ०५, २०२२

चंद्रपुरात सेवानिवृत्त सैनिकाची मिरवणूक

चंद्रपुरात सेवानिवृत्त सैनिकाची मिरवणूक


भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा ज्या, त्या गावांना अभिमान असतो. चंद्रपूर शहरातील गजानन तुराणकर हे सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांचा सन्मान करण्यासाठी आज ५ ऑगस्ट रोजी वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. आपल्या माता नगर भिवापूर वॉर्डातील सुपुत्र देशाचे रक्षण करतात याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा, या हेतूने निवृत्त सैनिकांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्याचे नागरिकांनी ठरविले होते.
ते ३१ डिसेंबर २००० मध्ये सेवेत रुजू झाले. नार्थ बंगाल भागात ट्रेनिंग झाल्यांवर श्रीनगर येथे पहिली पोस्टिंग मिळाली. त्यानंतर मेघालय, छत्तीसगड नक्षल विरोधी अभियान, न्यू कोच बिहार, इंदोर आदी ठिकाणी सेवा दिली आहे. या सत्कार सोहळ्यात माता नगर भिवापूर चे माजी नगरसेवक राजेंद्र आखरे, संजय चौबे, अमोल कामडे, शरद थिपे, मंगेश मालेकर, विक्रम मेश्राम, गुरु किणेकर, माजी नगर सेवक अजय खंडेल्वाल यांची उपस्थिती होती.