Chandrapur Breaking News | चारगाव धरणात बुडून दोन युवकाचा मृत्यू - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, ऑगस्ट २५, २०२२

Chandrapur Breaking News | चारगाव धरणात बुडून दोन युवकाचा मृत्यूby Shirish Uge
वरोरा |  स्थानिक शेगाव येथुन जवळच असलेल्या चारगाव धरण येथे आज दुपार तीन वाजताच्या सुमारास दोन युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  Two youths died due to drowning

      सविस्तर असे की बाहेर गावी शिकत असल्याने आज पोळ्या निमित्याने कॉलेज ला सुट्ट्या लागल्या असल्याने एन्जॉय म्हणून फिरण्याचा बेत घेऊन सर्व मित्र एकत्र येऊन चारगाव धरण येथे जाण्याचा बेत घेतला व इथे आले . सदर धरणाचे मनमोहक दृश्य पाहून फोटो काढण्यात सुरुवात केली तेव्हा मृतक हार्दिक विनायक गुळघाणे राहणार शेगाव बू.हा सेल्फी फोटो काढण्या करिता गेला असता पाय स्लीप होऊन पाण्यात पडला. तेव्हा मृतक आयुष चीडे राहणार वरोरा हा त्याला वाचविण्या करिता गेला असता तो सुधा पाण्यात पडला . तेव्हा या दोघाचा मृत्यू झाला.. यात हार्दिक विनायक गुळघाने वय १९ वर्ष राहणार शेगाव बू... तर दुसरा आयुष चिडे याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती शेगाव पोलीस स्टेशन शेगाव चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांनी घटना स्थळ गाठून मुलांना पाण्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गावातील श्री रामकृष्ण भट यांच्या सहकार्याने नाव्ह व लोखंडी गळ च्या साह्याने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले ...सदर मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदन करण्या करिता उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेण्यात आले . याचा अधिक तपास ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पोलीस कर्मचारी तपास करीत आहे . मृत युवक सोबत त्यांचे सवंगडी श्वेतम जयस्वाल राह.शेगाव बू. मयूर पारखी राह.वरोरा. आश्रय गोळगोंडे राह.वरोरा.हे मित्र तलाव बाहेर असल्याने त्यांचे प्राण वाचले..

Chandrapur News34 Mh 34 | Warora | Chandrapur Police