राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर आगमन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०४ ऑगस्ट २०२२

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर आगमन

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे
नागपूर विमानतळावर आगमन

नागपूर, दि. ०३ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज बुधवारी नागपूर विमानतळावर एक दिवसाच्या दौऱ्यासाठी रात्री आगमन झाले.
विमानतळावर प्रभारी विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे,विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी त्यांचे स्वागत केले.
    राज्यपाल उद्या दिवसभराच्या नियोजित कार्यक्रमासाठी आले आहेत. आज रात्री त्यांचा नागपूर राजभवनात मुक्काम असून उद्या गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव उद्घाटन सोहळ्याला कविवर्य सुरेश भट सभागृहात ते उपस्थित राहणार आहेत.