विज पडून गुराख्याचा मृत्यू तर एक जण जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०४ ऑगस्ट २०२२

विज पडून गुराख्याचा मृत्यू तर एक जण जखमी

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)

: नगर पालिका क्षेत्रातील व एकात्मिक बरांज खुल्या कोळसा खाणी लगत असलेल्या चिचोर्डी शेत शिवारात पाळीव जनावरे राखत असलेल्या गुराख्यावर अचानक वीज गर्जनेसह अचानक आलेल्या पावसात वीज पडून एका गुराख्याचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना दि.३ ऑगस्टला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

संजय काशिनाथ चालखुरे (५५) रा. बरांज मोकासा असे वीज पडून मृत्यू झालेल्या गुराख्याचे नाव असून विकास डाखरे (२२) रा.बरांज मोकासा असे जखमीचे नाव आहे. हे दोघेही चीचोर्डी शेत शिवारात पाळीव जनावरे राखत होती. अचानक झालेल्या वीज गर्जनेच्या पावसात ही घटना घडली. मृत गुराख्याचे प्रेत उत्तरीय तपासणीस ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे. मृतक हा आपल्या आईकडे राहत असून पत्नी सोडचिठठी देऊन गेली. त्यास एक मुलगी असून मागील वर्षी लग्न होऊन आपल्या सासरी आहे. त्याच्या मृत्यूमुळे गावात एकच शोककळा पसरली.