चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलपोळा - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑगस्ट २७, २०२२

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलपोळावर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दर वर्षी बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चंद्रपूर  जिल्ह्यात या सणाचे एक विशेष महत्त्व आहे. श्रावणात पिठोरी अमावस्येला बैल पोळा साजरा केला जातो. आजच्या दिवशी गावातील सर्व बैलजोडी हनुमान मंदिर शेजारी पटांगणात आणण्यात आल्या. यावेळी पूजाअर्चा झाल्यावर झडत्या म्हणण्यात आल्या. त्यानंतर पुजाऱ्याच्या सूचनेनंतर पोळा फुटला आणि शेतकऱ्यांनी  आपली जोडी घराकडे नेली. घरी गेल्यावर गृहिणींनी त्याची पूजा केली आणि नैवद्य दिले. 

यंदा कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने दोन वर्षानंतर पोळा सण मोठ्या उत्साहात सण साजरा झाला. शहरी भागातही या सणानिमित्त उत्साह दिसून आला. ज्यांच्याकडे शेती नाही अशांनी मातीच्या बैलाची पूजा केली.Watch video on YouTube here: https://youtu.be/Zp3b3N0atXY