लोकमान्य विद्यालयात लॊकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

गुरुवार, ऑगस्ट ०४, २०२२

लोकमान्य विद्यालयात लॊकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)

येथील लोकसेवा मंडळातर्फे संचालित येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात लोकमान्य टिळक यांची १०२ वी पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते.तर प्रमुख अतिथी म्हणून लोणारा येथील साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद गोरंटीवार, प्रसिद्ध कीर्तनकार डॉ. मृण्मयी कुलकर्णी, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्करवार, लोकसेवा मंडळाचे सहसचिव नामदेवराव कोल्हे, सदस्य संजय पारधे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या आशालता सोनटक्के आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम सरस्वती माता, लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील पहिल्या तीन यशस्वी स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.मृण्मयी कुळकर्णी यांनी आपल्या कीर्तनातून लोकमान्य टिळकांचे चरित्र व कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच लोकमान्य टिळकांचे चरित्र सर्वांनी वाचावे असे आवाहन केले.

याप्रसंगी प्राचार्य डॉ.विनोद गोरंटीवार, डॉ. महाकाळकर आणि चंद्रकांत गुंडावार यांनी आपल्या भाषणातून लोकमान्य टिळकांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यिनींनी स्वागत गीत सादर केले. 
     
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या आशालता सोनटक्के यांनी केले. संचालन प्रा. अस्मिता झुलकंटीवार यांनी केले. तर आभार पर्यवेक्षक रुपचंद धारणे यांनी मानले. शिक्षिका कु. प्राजक्ता चिखलीकर यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. 
      कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, विद्यालयाचे आजी-माजी शिक्षक व नागरिक उपस्थित होते.