पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने ' ए वतन ' देशभक्ती गीत कार्यक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०१ ऑगस्ट २०२२

पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने ' ए वतन ' देशभक्ती गीत कार्यक्रम

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली .त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभानिमित्त इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसने सन्मानित पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने ' ए वतन ' या देशभक्तीने ओतप्रोत अशा गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
गेल्या वर्षी १५ ऑगस्टला पद्मगंधा प्रतिष्ठानने 'स्वातंत्र्य संग्रामातील सौदामिनी ' या अंतर्गत विविध प्रांतातील २५ रणरागिणी घेऊन एक अतिशय अप्रतिम असा एकपात्री प्रयोग असलेला कार्यक्रम सलग तीन दिवस आयोजित केला होता.
'ए वतन ' हा कार्यक्रम सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार डॉ दत्ता हरकरे आणि सुप्रसिद्ध गायिका कनका गडकरी यांच्या सुमधुर स्वरात भारत देशाचा जाज्वल्य इतिहास देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती समोर आणण्याचा मनापासून केलेला संकल्प आहे. कार्यक्रमाचे निवेदन प्रभा देऊस्कर यांचे असून या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मा. डॉ. परिणीता फुके या आहेत.
हा कार्यक्रम रविवार दिनांक ७ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता बाबुराव धनवटे सभागृह, वोकहार्टच्या मागे ,शंकरनगर इथे संपन्न होईल.सर्व देशप्रेमी रसिकांनी अवश्य यावं असे आयोजकांनी कळवले आहे.

संगीता वाईकर
सचिव पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूर