भोयेगाव-कवठाळा-गडचांदूर रस्त्यावर 31 ऑगस्टपर्यंत सर्वप्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०५ ऑगस्ट २०२२

भोयेगाव-कवठाळा-गडचांदूर रस्त्यावर 31 ऑगस्टपर्यंत सर्वप्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी

 भोयेगाव-कवठाळा-गडचांदूर रस्त्यावर 31 ऑगस्टपर्यंत सर्वप्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी

Ø पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे नागरीकांना आवाहनचंद्रपूर, दि. 5 ऑगस्ट : भोयेगाव-कवठाळा-गडचांदूर या मार्गावर रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटचे काम चालू आहे व त्याकरीता वापरण्यात येणारी मशिनरी ही खूप मोठी आहे. रस्ता बांधकाम करताना जड वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक आहे. जड वाहतूक सुरू ठेवल्यास लहान वाहनास येण्या-जाण्याकरीता रस्ता अपुरा पडत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकेरी मार्गाने वाहतुक बंद पडल्यास संपूर्ण वाहतुक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावर 31 ऑगस्टपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. Chandrapur Bhoygaon Gadchandur

अवजड वाहतूकदारांनी गडचांदूरकडून चंद्रपूर येण्यासाठी गडचांदूर-राजुरा-बल्लारशा-चंद्रपूर या मार्गाचा वापर करावा. तसेच  गडचांदूरकडून घुगुसकडे जाण्यासाठी गडचांदूर-आवाळपुर-गाडेगाव- कवठाळा-भोयेगाव-घुगुस या मार्गांचा वापर करता येईल. भोयगांवकडून गडचांदूरकडे जाण्यासाठी कवठाळा-गाडेगाव-आवाळपुर-गडचांदूर मार्ग उपलब्ध असल्याने कवठाळा ते गडचांदूर हा रस्ता जड वाहनांकरीता पूर्णपणे बंद करण्याची सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.-1, चंद्रपूर यांनी कळविले आहे. PWD

मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम-33 (1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर रहदारीचे करावयाचे नियमनासाठी प्राप्त असलेल्या कायदेशीर अधिकारान्वये, कवठाळा ते गडचांदूर या रस्त्याचे काम सुरू असल्याने कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही व वाहतुकीचे नियमन व्हावे तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याकरीता 30 जुलैपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंद करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र याबाबत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 1 यांचे पत्र प्राप्त झाल्याने सदर अधिसूचनेत दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ करण्यात येत आहे. त्यामुळे  31 ऑगस्ट 2022 पर्यंत सर्वप्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंद करण्यात येत आहे. Police

या निर्देशाचे पालन करून जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात येत आहे. trafic rider latest mod apk


chandrapur job vacancy 2022

Anne Heche | Kim Kardashian | Premier League | The Sandman
Diego Bertie | Thirteen Lives | What is monkeypox | Tiger Woods

Conor McGregor | Ezra Miller