‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ Ø स्पर्धा – 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, ऑगस्ट २३, २०२२

‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ Ø स्पर्धा – 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर

नागपूर दि. 23 : गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धकांसाठी 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत निवडणूक आयोगाच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे.
या स्पर्धेबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत मतदार ओळखपत्राला आधार कार्ड क्रमांकाची जोडणी, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या, नवीन सुधारणान्वये मतदार नोंदणीसाठी लागू झालेल्या 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर या चार अर्हता तारखा यासाठी प्रसार व प्रचार करावा तसेच अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

माझा गणेशोतसव माझा मताधिकार’ या स्पर्धेसाठी फोटो आणि ध्वनिचित्रफीत हे साहित्य पाठवायचे आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता स्पर्धकांनी 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीमध्ये https://forms.gle/6jifuUA4YSRZ6AU7 या गुगल अर्जावरील माहिती भरुन पाठवावे. तसेच स्पर्धेविषयी नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयीन संकेतस्थळ  https://cco.maharashtra.gov.in यावर वाचायला मिळेल. स्पर्धेमधील सर्वोत्उत्कृष्ट स्पर्धकांना रोख रकमेसह पारितोषिक देवून गौरवान्वयीत करण्यात येईल. स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे.