कल्पनाताई बगूलकर यांच्या मागणीतून 3 अपंग व्यक्तींना तिन चाकी स्वयंचलित (बॅटरी) सायकल वाटप - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, ऑगस्ट २४, २०२२

कल्पनाताई बगूलकर यांच्या मागणीतून 3 अपंग व्यक्तींना तिन चाकी स्वयंचलित (बॅटरी) सायकल वाटप

मा श्री सूधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून भाजपा माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांच्या मागणीतून 3 अपंग व्यक्तींना तिन चाकी स्वयंचलित (बॅटरी) सायकल वाटप करण्यात आल्या.चंद्रपूर - महाविकास आघाडी सरकारचा काळात मा श्री सूधीरभाऊ मुनगंटीवार यांना माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांनी बाबूपेठ व लालपेठ वार्डातील 3 अपंग व्यक्तींना तिन चाकी स्वयंचलित बॅटरी सायकल ची मागणी केली होती. f three-wheeled automatic (battery) bicycles

मा सूधीरभाऊनी पत्रव्यवहार करून मंजूर करून दिले. आज दिनांक 23/8/2022 ला तेली समाज गणेश मंदिर, गूरूदेव चौक, बाबूपेठ वार्ड,चंद्रपूर येथे भाजपा माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांनी 3 अपंग व्यक्तींना तिन चाकी स्वयंचलित (बॅटरी) सायकल श्री शंकर चामटकर, श्री मोहन यादव, कु किरण सुमेर यांना वाटप करण्यात आल्या.

भाजपा माजी नगरसेविका तथा तेली समाज संघटिका सौ कल्पनाताई बगूलकर यांनी महाराष्ट्राचे वनमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, चंद्रपूर जिल्हयाचे विकासपूरूष व माझे राजकीय गूरू मा श्री सूधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मनःपूर्वक आभार मानले 🌹

या शूभप्रसंगी प्रामुख्याने तेली समाज अध्यक्ष बाबेपठ श्री श्रावण खनके, देवानंद धोडरे, कवडूजी बावणे, नंदकिशोर बगूलकर, भाजयूवामोर्चा सचिव मनिष पीपरे, भाजयूवामोर्चा  मंडळ उपाध्यक्ष विजय रामगिरकर, सौ विमल बावणे, श्रीमती अमृतकर काकू, श्री अमृतकर भाऊ, गणपत भाऊ, स्वप्नील जूनघरे, सावण बनारसे, साहिल चटप व ईतर मंडळी उपस्थित होते.


Distribution of three-wheeled automatic (battery) bicycles to 3 disabled persons on the demand of Kalpantai Bagulkar