22 हजार किलोमीटर सायकल चालवत पोहोचला लोहाऱ्यात - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, ऑगस्ट २२, २०२२

22 हजार किलोमीटर सायकल चालवत पोहोचला लोहाऱ्यात






पर्यावरणाचा उद्देश्य घेऊन पर्यावरण संवर्धन लोकांना संदेश देऊन प्रदूषणाबद्दल जाणीव करून दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चाललेल्या आणि आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे अशा वेळेस सायकलच्या वापर करून आपण प्रदूषण दूर करू आणि झाडे लावां पर्यावरण वाचवा असा संदेश देत उत्तर प्रदेश मधील गाजिपुर जिल्ह्यातील प्रदीप कुमार हा आपला प्रवास 28 ऑक्टोंबर 2021 ला चालू केलेला आहे आणि नेपाल , बांगलादेश असे दोन देश व बारा राज्य पूर्ण करून तब्बल 22 हजार किलो मीटर पूर्ण करून आपल्या चंद्रपुर गडचिरोली मार्गानी लोहारा या गावात आलेला आहे

 आणि त्याचबरोबर सायकलने भ्रमण करून संपूर्ण महाराष्ट्राचा 14 हजार किलोमटरचा प्रवास करणारी पर्यावरण संवर्धन नाचा संदेश देणारी आपल्या महाराष्ट्रतील यवतमाळ जिल्हा गाव पुनवट येथील विद्यार्थिनी प्रणाली चिकटे ही सुद्धा त्याच्या स्वागताकरिता त्याच्यासोबत गडचिरोली कडे भ्रमण करीत असताना चंद्रपूर येथील प्रतिश जीवने हा त्यांच्यासोबत भ्रमण करायला निघाला असता लोहार या गावात त्यांचे आगमन आणि तेथील त्यांचे मित्र मुकुल मेश्राम, विकी कजली वाले, यांना व तसेच गावातील उपसरपंच शालिक मरसकोल्हे यांना भेट देऊन तिथे वृक्षारोपण करून समोर भ्रमण करायला निघाले. यावेळी 1 प्रदीप कुमार ( उत्तर प्रदेश गाजीपुर जिल्हा), प्रणाली चिकटे (महाराष्ट्र यवतमाळ जिल्हा गाव पूनवत), प्रतीमेश जीवने ( महाराष्ट्र चंद्रपूर) यांची उपस्थिती होती.