दोन वर्षांनंतर पुन्हा त्याच इमारतीचा लोकार्पण सोहळा - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

शुक्रवार, जुलै १५, २०२२

दोन वर्षांनंतर पुन्हा त्याच इमारतीचा लोकार्पण सोहळा

 


       दोन वर्षांपूर्वी वरोरा येथील नगरपरिषदेची सर्व सोयींनी युक्त अशी इमारत बांधण्यात आली. या इमारतीच्या बांधकामासाठी अंदाजे सात कोटी रुपये खर्च करण्यात आले.या इमारातिसाठी   माजी अर्थ मंत्री श्री.सुधीरभाऊ मूनगंटिवार यांनी निधी दिला होता.माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली हा निधी आणून ईमारतीचे लोकार्पण करून न.प.चे कामगाज सुद्धा सुरु केले होते. वरोरा येथील नगरपरिषद इमारतीचा लोकार्पण सोहळा आटोपून या इमारतीतून कामकाज सुरू झाले असतांना पावणे दोन वर्षांनंतर पुन्हा त्याच इमारतीचा लोकार्पण सोहळा करण्याची किमया येथील नगरपरिषद प्रशासक करीत असल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. #warora #muncipal #corporation

         या इमारतीचे बांधकाम  पूर्ण झाल्यानंतर नगरपरिषद जुन्या इमारतीतून २० आक्टोबर २०२० ला नवरात्रीच्या दिवशी नवीन इमारतीत स्थानांतरीत झाली. यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी सूर्यकांत पिजदूरकर, विरोधी पक्षनेते गजाननराव मेश्राम , सर्व नगरसेवक , नगरसेविका व समस्त कर्मचारी वर्ग उपस्थित होते. 

          नवीन इमारतीत कामकाज सुरू होऊन २० महिन्यापेक्षा जास्त कालावधी  आटोपला असतांना १६ जुलै २०२२ ला होणार्‍या दुसरयांदा नगरपरिषद इमारतीच्या लोकार्पण सोहळा आयोजित केला गेलेला आहे हि बाब असंविधानिक असून मुख्याधिकारी यांचा कार्यावर प्रश्न निर्माण झाले आहे.