आषाढीनिमित्त कैलास नगर ते शिव मंदिर जूगादपर्यंत वारी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१० जुलै २०२२

आषाढीनिमित्त कैलास नगर ते शिव मंदिर जूगादपर्यंत वारी
आज दिनांक 10 - जुलै -२०२२ रविवार रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने कैलाश नगर येथे पहिल्यांदा वारीचे आयोजन केले होते या वारीत कैलास नगर शिव मंदिर ते यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध हेमाडपंथी काळातीलं शिव मंदिर जुगाद इथपर्यंत ही वारी आयोजित केल्या गेली होती.
या वारीत टाकळी इथले भजन मंडळ व तसेच कैलास नगर, जुगाद, माथोली ,टाकळी, कोलगाव, इथले सर्व भक्तजन एकत्रित झाले होते ही वारी कैलास नगर ते जुगाद पायदळ काढण्यात आली होती तसेच ही पहिल्यांदी कडलेली वारी खूप चांगल्या प्रकारे पार पडली लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या वारी माथूली सरपंच ,टाकळी सरपंच ,कोलगाव सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य माथोली उपस्थित होते, महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता , विठू माऊलीच्या दर्शना सोबतच महादेव दर्शन ही करण्यात आले व शिवमंदिर येथे भजनही झाले व पूजा समाप्त झाले.

Wari from Kailas Nagar to Shiva Temple Jugad for Ashadhi