चंद्रपूर जिल्हा वंचित बहुजन युवा आघाडी कार्यकारिणी बरखास्त | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०८ जुलै २०२२

चंद्रपूर जिल्हा वंचित बहुजन युवा आघाडी कार्यकारिणी बरखास्त |


महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांचे आदेश


वंचित बहुजन युवा आघाडी चंद्रपूर (Chandrapur) कार्यकारणी तसेच शहर कार्यकारणी बरखास्त करण्यात येत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी दिली आहे. या संदर्भातील पत्र 8 जुलै रोजी त्यांनी वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

वंचित बहुजन युवा आघाडी (vanchit bahujan aaghadi) चंद्रपूर जिल्हा आणि शहर कार्यकारणी बाबत मागील काही दिवसांपासून समाधानकारक कार्य नसल्याचे म्हटलेले आहे. वंचित बहुजन युवा आघाडी (Chandrapur) चंद्रपूर जिल्हा आणि शहर कार्यकारणीचे काम समाधान कराकर नसल्याचे दिसून आले आहे. नियुक्तीपासून युवा आघाडी बांधणी करणे, तसेच पक्षाचा आढावा बैठक, प्रशिक्षण, आंदोलने यामध्ये कुठलाही प्रकारे सहभाग नाही. त्यामुळे दोन्ही कार्यकारिणी करण्यास बरखास्त करण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  प्रदेश कमिटीच्या वतीने लवकरच युवा आघाडी करिता मुलाखती घेऊन चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील जिल्हा आघाडी आणि शहर कार्यकारणी गठित करण्यात येईल, अशी माहिती देखील प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा (nilesh Wishvakarma) यांनी दिली.

वंचित बहूजन युवा आघाडी चंद्रपूर जिल्हा आणि शहर तसेच बीड जिल्ह्या पश्चिम तसेच सर्व तालुका, शहर, युवा आघाडी कार्यकरणी मा प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा ह्यांचे आदेशानुसार बरखास्त करण्यात आल्या आहेत.बीड जिल्हा युवा निरीक्षक पद देखील रद्द करण्यात आले आहे.
प्रदेशच्या वतीने मुलाखती घेऊन नव्याने चंद्रपूर व बीड पश्चिम कार्यकरण्या करण्यात येतील.

राजेंद्र पातोडे
महासचिव
वंचित बहूजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश

वंचित बहुजन आघाडी हा प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेला एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांसोबत युती किंवा आघाडी आहे. 


Nilesh Vishwakarma (@nilesh_vishwakarma.1