३० जुलै २०२२
चंद्रपुरात चालकाविना चालला ट्रक
नांदगाव कोळसा खाणी जवळील घटना
कोळसा (Coal) भरलेला ट्रक उभा करून चालक चेक पोस्टवर माहिती देण्यासाठी गेला आणि तितक्यात उभा असलेला ट्रक आपोआप पुढे जाऊ लागला. बघता बघता तो काही दूर पुढे गेला आणि बाजूच्या नालीत जाऊन फसला. या घटनेत कोणतीही दुखापत झाली नसले तरी ट्रक चालकाची दुचाकी चेंदामेंदा झाली. ही घटना चंद्रपूर शहराजवळील नांदगाव भूमिगत कोळसा खाणी (Nandgaon UnderGraund Coal Mines) जवळ आज 30 जुलै रोजी दुपारी घडली.
प्राप्त माहितीनुसार नांदगाव भूमिगत कोळसा खाणीतून कोळसा भरून बाहेर निघालेला ट्रकचा चालक आपले वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून चेक पोस्टवर माहिती देण्यासाठी गेला. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ट्रक उभा केला तो रस्ता देखील उतार होता. त्याचवेळी ट्रकचे गिअर फ्री झाले आणि ट्रक आपोआप चालकाविना पुढे जाऊ लागला. दूर गेल्यानंतर हा ट्रक जवळच्या नालीत जाऊन अडकला. रस्त्यावर नागरिक होते. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित दुर्घटना घडली नाही. पण याच ट्रक चालकाची रस्त्याच्या कडेला ठेवलेली दुचाकी मात्र चेंदामेंदा झाली.
A truck ran without a driver in Chandrapur
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
