विकासाचा झंझावात म्हणजे मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

शुक्रवार, जुलै २९, २०२२

विकासाचा झंझावात म्हणजे मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार


विकासाचा झंझावात म्हणजे मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार
माजी अर्थमंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार हे मागील ४० वर्षापासून सक्रिय राजकारणात आहेत. सुधीरभाऊंना राजकारणात सत्तेचा कार्यकाळ तसा कमीच मिळाला. परंतु , मिळालेल्या काळात विकास साधण्यासाठी त्यांनी वेगाने प्रयत्न केले. अधिकाऱ्याकडून काम करून घेतांना कायदे व नियम याचे सखोल ज्ञान ठेवणारे व कामाचा सातत्यपूर्ण अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करण्याचे तंत्र ज्यांना गवसले आहे. त्यापैकी एक अनुभवी नेतृत्व म्हणजे विकासपुरुष सुधीरभाऊ मुनगंटीवार.

सत्तेत काम करून घेताना फार अडचणी येत नाहीत. मात्र, विरोधी पक्षात राहूनही सुधीरभाऊ यांनी अनेक कामे केली आहेत. सत्ता असो अथवा नसो विकासासाठी सदैव तळमळीने प्रयत्न करताना दिसले व आजही तितक्याच ताकतीने प्रयत्न करत आहेत.

अर्थमंत्री असताना महाराष्ट्रात अनेक मोठे प्रकल्प तसेच चंद्रपूर जिल्ह्यात मोठा निधी देत विकास करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केला. विकासकामांसाठी सढळ हाताने निधी देत विकासाचा झंझावात कायम ठेवला. चंद्रपूर जिल्ह्यासाठी ते विकासाचे भगीरथच म्हणावे लागेल इतका मोठा निधी दिला. महाराष्ट्राच्या विकासगंगेत "ना भूतो ना भविष्यती" असे योगदान दिले.

सैनिकी शाळा ,वन अकादमी, बॉटनिकल गार्डन, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र,नियोजन भवन, कोषागार भवन, अभ्यासिका, वस्तीगृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल, वन विभागाची देखने विश्रामगृह, इको पार्क मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील काँक्रीट रोड अशा अनेक योजनांच्या रूपाने सुधीर भाऊंनी जिल्ह्याच्या विकासात मोठी भर टाकली.

विशेषत्वाने सांगता येईल ते म्हणजे संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना. या योजनेत विधवा, अपंग, परीतक्त्या, महिला तसेच वृद्ध व निराधार यांना मिळणारे सहाशे रुपये अनुदान वरून थेट एक हजार रुपये अनुदान करण्यास सुधीर भाऊचा फार मोठा वाटा आहे.

आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार महाराष्ट्राचे वनमंत्री असताना तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्‍प जाहीर केला. महाराष्ट्राला हिरव्या सावलीत आणण्याचे स्वप्न बघत तो पूर्ण करण्यासाठी लोकसहभागाचा वापर करत तो पूर्ण केला. सुधीरभाऊंचा हा विक्रम कायम इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरात कायम राहील.

भाऊंच्या कार्यपद्धतीने विशेष कार्य झाले, तो वनविभाग म्हणजे कायम दुर्लक्षित विभाग. या विभागाला सुधीरभाऊंनी अनेक मोठे व विक्रमी निर्णय घेत प्रकाशात झोतात आणलं व अनेक लोकहिताचे निर्णय घेत जनतेला या विभागाकडून न्याय मिळवून दिला .

विकासाचा झंझावात आता पुन्हा नव्याने सुरू झाला आहे.शिंदे व फडणवीस सरकार सत्तेत एकत्र आले आहे. भाऊंना महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी पुन्हा जबाबदारी या सरकारमध्ये मिळणार आहे, मिळणारे दायीत्व पुन्हा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील यात शंका नाही.

महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यात, शेवटच्या घटकापर्यंत विकास करण्यासाठी सुधीरभाऊंचा हा रथ विकासाच्या मार्गावर पुन्हा विक्रम प्रस्थापित करत, आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र लवकरच आपल्या हातून घडो हीच *श्री कृष्णाचरणी प्रार्थना* आपल्या जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

- श्रीकांत मलोझलवार