माजी आमदाराने घेतला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद सोडण्याचा निर्णय | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१८ जुलै २०२२

माजी आमदाराने घेतला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद सोडण्याचा निर्णय |
जुन्नर /आनंद कांबळे 
पुणे जिल्हा प्रमुख शरद सोनवणे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद सोडण्याचा निर्णय एका पत्राद्वारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळविले. सोनवणे हे सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम पहात होते. ते माजी आमदार आहेत. ग्रामीण भागात राष्ट्रवादी पक्षाशी जुळवून घेणे शक्य नाही असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. मात्र पुढील भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. वेट आणि वाँच अशी सध्या त्यांची भूमिका दिसत आहे. #shivsena #maharashtra

त्यानी आपल्या पत्रात लिहले आहे की, मागील दोन वर्षा पासून पुणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे . एक शिव सैनिक म्हणुन मी आपला प्रथमतः ऋणी आहे . मागील तीन वर्षा पासून आपले सरकार आल आणि भारतीय जनता पार्टी सोबत आपली ४५ वर्षा पासून ची जि युती होती ती आपापसातल्या भांडणमुळे ती युती तुटून आपण महाविकास आघाडी सरकार स्थापनेचा निर्णय घेतला.  परंतु पशिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी मुळे शिवसैनिक खचत व संपत चालला होता. 

काही दिवसा पूर्वी आम्ही आपणांस भेटलो असताना तुम्ही आम्हास सांगितले कि नाइलाजाने आपल्याला कुठल्याही परिस्थितीत  राष्ट्रवादीशी तडजोड करून इथून पुढच्या काळात काम करावे लागेल. साहेब आपल वरच्या पातळीचे राजकारण वेगळे आहे, पण खाली तळागाळातील सर्व सामन्य कार्यकर्त्यांच राजकारण हे  नेहीमच संघर्षाच राहिलेल आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीशी आमच मनोमिलन होणार नाही. त्यामुळे मी आपल्या पदाचा सन्मान ठेऊन माझे जिल्हा प्रमुख पद आपल्या कडे पुन्हा सुपूर्द करत आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी मी पुन्हा एकदा कार्यरत राहणार आहे. हि जिल्हा प्रमुख पदाची जवाबबदारी आपण दुसर्या कुणालाही द्यावी साहेब , इच्छा नसताना मी आपल्यापासून बाजूला होत आहे. साहेब , आपल्यावर नाराजी नाही पण आपण घेतलेल्या निर्णयामुळे नाराजी आहे. आम्ही जनहितासाठी पुढील कामाला सुरवात करत आहोत कळावे. 

शरद सोनवणे , किल्ले शिवनेरी संपर्क कार्यालय ' रायगड ' , चाळकवाडी ( पिंपळवंडी ) , ता . जुन्नर , जि . पुणे . 


#maharashtra #mumbai #india #pune #marathi #ig #love #instagram #photography #instagood #status #delhi #bhfyp #nashik #marathimulgi #marathistatus #kerala #nature #punekar #follow #kolhapur #marathimulga #like #indian #likeforlikes #trending #maratha #desha #travel #satara

#shivsena #maharashtra #mumbai #bjp #uddhavthackeray #india #marathi #balasahebthackeray #yuvasena #ncp #sharadpawar #congress #pune #narendramodi #ajitpawar #adityathackeray #maratha #politics #rajthackeray #ig #saheb #sharadpawarspeaks #supriyasule #mns #hindu #modi #balasaheb #yuvashivsena #aadityathackeray #thackeray