वारजूरकरांच्या मद्यपार्टीत वरेटवारांवर गुन्हा | - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

बुधवार, जुलै ०६, २०२२

वारजूरकरांच्या मद्यपार्टीत वरेटवारांवर गुन्हा |

 वारजूरकरांच्या मद्यपार्टीत गुन्हा 
हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरसमारी गावाजवळील प्रशस्त गिरनार फार्महाऊसजवळ रेव्ह पार्टी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकला. बेधुंद नशेत तरुण-तरुणी संगीताच्या तालावर नृत्य करताना आढळले. सईश वारजूरकर यांनी आयोजित केलेल्या या पार्टीप्रकरणी पोलिसांनी छगन पटेल आणि शिव वरेटवार  यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील सईश वारजूरकर यांनी ही पार्टी आयोजित केली होती. पार्टीसाठी ग्रामपंचायत, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आली होती. या पार्टीत पुणे, मुंबईसारख्या शहरातून शेकडो तर इतर भागातून अंदाजे तीन हजार तरुण-तरुणी गिरनार फार्महाऊसमध्ये आल्या होत्या. त्यांच्यासाठी सहआयोजक छगन कुवजीभाई पटेल (६५) आणि शिव वरेटवार(३२) रहाटे कॉलनी यांनी महागडी विदेशी दारू आणि अन्य अंमली पदार्थाची व्यवस्था केली होती, असे सांगण्यात येत आहे. एका प्रादेशिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांना मध्यरात्री उशिरापर्यंत रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती मिळाली. छापा पडल्यानंतर पार्टीत एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी या पार्टीतून मोठय़ा प्रमाणात दारू, डीजे साहित्य, एलएडी असा १० लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी छगन पटेल आणि शिव वरेटवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


संबंधित शोध