माजी नगरसेवक सचिन भोयर यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

३० जुलै २०२२

माजी नगरसेवक सचिन भोयर यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

नाना पटोलेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

माजी नगरसेवक सचिन भोयर (@sachinbhoyar) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शनिवारी राजुरा येथे काँग्रेसमध्ये #Congress पक्षप्रवेश केला. 

सचिन भोयर हे गडचांदूर नगरपरिषद चे माजी उपाध्यक्ष असून, ते गडचांदूर येथील शिवसेनेचे #shivsena मोठे नेते आहेत. ते रावी पेट्रोलपंपाचे संचालकदेखील आहेत. दरम्यान त्यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाने शिवसेनेला मोठी खिंडार पडण्याची शक्यता आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सचिन भोयर यांनी काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश केल्यानं काँग्रेसची ताकद आणखी वाढणार आहे.यावेळी आमदार सुभाष धोटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Sachin Bhoyar (@sachinbhoyar29) / Twitter

  @sachinbhoyar29 #Congress #shivsena