अवघ्या सहा महिण्यात अपघातातील मृत्यू संख्या धक्कादायक | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१७ जुलै २०२२

अवघ्या सहा महिण्यात अपघातातील मृत्यू संख्या धक्कादायक |

KHABARBAT


४७४अपघात; २४२ जणांचा मृत्यू  


CHANDRAPUR (DEONATH GANDATE) 

चंद्रपूर | जिल्ह्यात दारूबंदी उठल्यापासून गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत अपघात संख्या धक्कादायक आहे.  2022 मध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यात अपघातांची संख्या 474 वर पोहचली. यात 242 नागरिकांचा मृत्यु झाला आहे. सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे झालेत. 


चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवून आणि प्रत्यक्ष दारूविक्री सुरु व्हायला आता एक वर्ष पूर्ण झाला. या एका वर्षात जिल्ह्यातील गुन्हेगारीत मोठी वाढ झालेली दिसत आहे. विशेषतः खून, बलात्कार आणि कौटुंबिक कलह या सारख्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यावर गुन्ह्यांच्या प्रमाणात घसरण झाली होती. मात्र दुसरीकडे अवैध दारू विक्री, तस्करी आणि त्यात सामील झालेल्या लोकांमध्ये मोठी वाढ झाली हे देखील तितकंच खरं आहे. आता दारू सुरु झाल्यामुळे या गुन्हेगारीच्या या ग्राफने पुन्हा उचल खाल्ली आहे. अपघाताच्या घटनात लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यात 6 लक्ष 73 हजार वाहनांची नोंदणी आहे.   2020 – 21 मध्ये जिल्ह्यात 319 अपघात झाले. यात 171 लोकांचा मृत्यु झाला. 2022 मध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यात अपघातांची संख्या 474 वर पोहचली. यात 242 नागरिकांचा मृत्यु झाला आहे.  एकूण अपघातात 20% अपघात दारूच्या प्रभावाने होतात. गुन्ह्यांमागे दारू हा एक महत्त्वाचा घटक असतो, असे जागतिक अहवाल आहे.