रणजितसिंह डिसले यांनी दिला राजीनामा | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१२ जुलै २०२२

रणजितसिंह डिसले यांनी दिला राजीनामा |
सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले उपशिक्षक रणजितसिंह डिसले यांनी २०१७ ते २०२० या कालावधीत काय केले, याबाबत सखोल चौकशी झाली आहे. याबाबत एक फाईल तयार करण्यात आली आहे. हा चौकशी अहवाल जिल्हापरिषद सीईओंकडे गोपनीयरित्या सादर करण्यात आला आहे. पण रणजितसिंह डिसले यांनी कारवाई होण्याअगोदर ७ जुलै रोजी माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शिंदे यांकडे राजीनामा सादर केला आहे.सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले उपशिक्षक रणजितसिंह डिसले यांनी २०१७ ते २०२० या कालावधीत काय केले, याबाबत सखोल चौकशी झाली आहे. याबाबत एक फाईल तयार करण्यात आली आहे. हा चौकशी अहवाल जिल्हापरिषद सीईओंकडे गोपनीयरित्या सादर करण्यात आला आहे. परंतु, सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी हे अगोदर आषाढी वारी आणि आता कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याने डीसले गुरुजींचा अहवाल सीईओ नी वाचला नाही आणि कारवाई झाली नाही. पण रणजितसिंह डिसले यांनी कारवाई होण्याअगोदर ७ जुलै रोजी माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शिंदे यांकडे राजीनामा सादर केला आहे.