येत्या ३ दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२५ जुलै २०२२

येत्या ३ दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस.

#BIGNEWS Monsoon
विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा जोर धरणार
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
नागपूर, चंद्रपूर, अकोला, गडचिरोली, गोंदियाला ‘यलो अलर्ट’


येत्या ३ दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढचे ३ दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही जिल्ह्यांत पूरस्थिती होती. राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर या भागातील नद्यांची पाणी पातळी घटली असून पूरही ओसरला आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याने विदर्भाची चिंता वाढवलीय. विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. याशिवाय मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आलाय.
मागील आठ दिवसापासून गायब असलेल्या पावसानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे. रात्रीपासून जिल्ह्याचा अनेक भागांमध्ये सरींवरती पाऊस बरसत आहे. कोसळणाऱ्या सरी या जोरदार अशाच आहेत. सध्या देखील जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. रात्री उशिरा जिल्हा माहिती कार्यालयाने जगबुडीबाबत दिलेली माहिती आहे. पाऊस पडत असला तरी जिल्ह्याच्या जनजीवनावरती मात्र कोणताही मोठा परिणाम झालेला नाही.