४ वर्षाच्या लहान मुलीला पळविले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२४ जुलै २०२२

४ वर्षाच्या लहान मुलीला पळविले

४ वर्षाच्या लहान मुलीला पळविणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले


जुन्नर /आनंद कांबळे (वार्ताहर )

जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक २३/०७/२०२२ रोजी रात्री ११:०० वाजता पासून जुन्नर शहरात पोसई दिलीप पवार, पो हवा भरत मुठे, चालक पोना संतोष पठारे असे रात्रगस्त करीत असताना, दिनांक २४/०७/२०२२ रोजी ०१:०० वाजताचे सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी मा. मंदार जवळे व विकास जाधव, पोलीस निरीक्षक, जुन्नर पोलीस स्टेशन यांनी रात्रगस्त अधिकारी दिलीप पवार यांना फोनद्वारे माहिती दिली की, पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंडवड, चिखली पोलीस स्टेशन Page नं. ३८३ / २०२२, भा.द.वि कलम ३६३ मधील फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी ४ वर्षे, रा. संतकृपा हाऊसिंग सोसायटी, ताम्हाणेवस्ती, चिखली, पुणे हीस कोणीतरी अज्ञात आरोपीने फिर्यादी यांचे कायदेशिर रखवालीतून फिर्यादी यांचे संमतीशिवा पळवून नेले आहे.

सदर संशयीत आरोपीचे मोबाईल लोकेशन हे जुन्नर पोलीस स्टेशनचे हित असल्याचे मा.डी.सी.पी. काकासाहेब डोळे सो ए.सी.पी. प्रशांत अमृतकर, तसेच ए.सी.पी. पद्माकर घनवट, पिंपरी चिचंवड आयुक्तालय यांनी आदेशित केल्याने तात्काळ पोलीस स्टाफला घेवुन जुन्नर शहरातील महादेवनगर, जुने एस. टी स्टॅन्डजवळ संतोष मनोहर चौगुले यांचे राहते घरासमोर जावुन घराची पाहणी केली असता, घरात एक महिला व एक पुरुष तसेच एक लहान मुलगी दिसली.


त्यावेळी मंदार जवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जुन्नर विभाग व विकास जाधव, पोलीस निरीक्षक, जुन्नर पोलीस स्टेशन यांनी वॉट्सअॅपवर पाठविलेला पिडीत मुलीचा फोटो पाहुन संशय आल्याने सदर महिला व तीचे पती तसेच सदर अल्पवयीन मुलीस जुन्नर पोलीस स्टेशन येथे आणले. त्यावेळी मंदार जवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जुन्नर विभाग, .विकास जाधव, पोलीस निरीक्षक यांचेसमक्ष सदर महिलेकडे अधिक विचारपुस केली असता, तीने आम्हास उडवाउडवीचे उत्तरे दिले. त्यामळे संशय
बळावलेने तीचे पतीकडे तपास केला असता, त्याने कबुली दिली की, सदरची मुलगी हि माझी पत्नी नामे विमल संतोष चौगुले, वय २८ वर्षे, हिने तिची चिखली, पुणे येथील बहिणीचे शेजारी राहणारी मुलगी पळवून आणली आहे असे सांगीतल्याने, मंदार जवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जुन्नर विभाग यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथील डी.सी.पी काकासाहेब डोळे सो, यांना सदरची माहिती दिली. व. सदरची पिडीत मुलगी व महिला आरोपी नामे विमल संतोष चौगुले, वय २८ वर्षे, व तीचे पती संतोष मनोहर चौगुले, वय ४१ वर्षे, दोन्ही रा. महादेवनगर जुन्नर, ता. जुन्नर, जि.पुणे यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथील पोनि इंगवले व दरोडा प्रतिबंधक पथक, पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांचे ताब्यात पुढील कायदेशिर कारवाईकामी देण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई ही . डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण, मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मंदार जवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग, जुन्नर यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.विकास जाधव, जुन्नर पोलीस स्टेशन, पोसई, दिलीप पवार, पो. हवा भरत मुठे, चालक पो ना संतोष पठारे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सपोनि तौफिक सय्यद चिखली पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड, पोलीस आयुक्तालय, पुणे हे करीत आहेत.

police station junnar