Top News

डिजिटल मीडियाचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश | digital media

*‘ व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याला मोठे यश* *ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, रेडिओ आस्थापनांचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश* *मुंब...

ads

गुरुवार, जुलै २१, २०२२

ऑनलाईन जुगार व अश्लील साहीत्यावर पूर्णतः बंदी घाला #onlinegame #Lottory #pornvideo

युवा पिढीला बरबाद करणा-या ऑनलाईन जुगार व अश्लील साहीत्यावर पूर्णतः बंदी घाला


लोकसभेत खासदार बाळू धानोरकर यांची नियम 377 अन्वये मागणीचंद्रपूर (Chandrapur) : आपल्या देशात मोठ्याप्रमाणात बेरोजगारी आहे. युवा पिढी मोठ्या प्रमाणात कमी वेळात जास्त पैसे कमविण्याच्या नादात ऑनलाईन जुगार खेळत आहेत. यामध्ये करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. त्यासोबतच अश्लील साहित्य हि पिढी मोठ्या प्रमाणात बघत असल्याने भविष्य अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर केंद्र सरकारने त्वरीत प्रतिबंध घालावा अशी मागणी खा. बाळु धानोरकर  (Balu Dhanorkar) यांनी लोकसभेत नियम 377 अन्वये केली.


देशातील युवा पिढी बेरोजगारीने होरपळलेली आहे. मात्र ऑनलाईन उपलब्ध असलेली मटका बुकींग, एम.बी.किंग, गामा बट्स, रेडीना नावाने जुगार उपलब्ध असुन यात युवा पिढी प्रचंड संख्येने लुटल्या जात आहे. त्याबरोबरच सद्यास्थितीतील विद्यार्थी वर्गात ऑनलाईन वापर मोठया प्रमाणात होत असुन सहजतेने ऑनलाईनवर उपलब्ध असलेले अश्लील साहित्य व व्हिडीओ या सगळयांवर त्वरीत प्रतिबंध घालुन युवा पिढीचे आयुष्य बरबाद होण्यापासुन सरकार ने वाचवावे, अशी मागणी खासदार बाळु धानोरकर यांनी लोकसभेत केली.#onlinegame #Lottory #pornvideo


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.