चंद्रपूर : NEET Exam 2022 नीटच्या विद्यार्थ्यांना अतिवृष्टीचा फटका - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

रविवार, जुलै १७, २०२२

चंद्रपूर : NEET Exam 2022 नीटच्या विद्यार्थ्यांना अतिवृष्टीचा फटका

 नीटच्या विद्यार्थ्यांना अतिवृष्टीचा फटका

रविवारी झाली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा

वैद्यकीय प्रवेशासाठी दिली परीक्षा 

बारा केंद्रांवर चार हजारांवर विद्यार्थी 

 परीक्षा केंद्र शोधण्यासाठी धावपळ

चंद्रपूर(DEONATH GADATE/CHANDRAPUR ) : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) (NEET Exam 2022)  आज १७ जुलै (रविवार)  दुपारी दोन वाजता सुरू झाली. मात्र, अतिवृष्टीचा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. 


चंद्रपूर जिल्ह्यात पाहिल्यान्दाच हि परीक्षा घेण्यात आली . यापूर्वी नीटची परीक्षा नागपूरला होत होती. 

चंद्रपूर जिल्ह्यातील बारा केंद्रांवर चार हजारांवर विद्यार्थी नीट परीक्षा दिली. जिल्ह्याच्या विविध भागांमधून परीक्षा केंद्रांवर पोचण्यासाठी विद्यार्थ्यां ना पावसाळी गैरसोयीचा सामना करावा लागला.  गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील मार्ग पुरामुळे बंद असल्याने विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही. पावसामुळं रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांच्या रस्त्यातून मार्ग काढत त्यांना यावे  लागले. चंद्रपुरात आल्यानंतर परीक्षा केंद्र शोधण्यासाठी धावपळ करावी लागली.  दुपारी २ ते सायंकाळी साडेपाच पर्यंत ही परीक्षा झाली.