आघाडी करणे अनिवार्य आहे : प्रदेश राष्ट्रवादीची मागणी | - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

रविवार, जुलै १७, २०२२

आघाडी करणे अनिवार्य आहे : प्रदेश राष्ट्रवादीची मागणी |आगामी महानगर पालिका निवडणुकीत काँग्रेस व सेनेशी (#ncp #maharashtra #Shivsena) आघाडी करणे आवश्यक असल्याची मागणी प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले ह्यांनी पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार ह्यांना निवेदन देऊन केली. ५२ प्रभागात प्रत्येकी एक उमेदवार आपला असावा अशी मागणी करून ५२ सक्षम उमेदवारांची निवड करून ह्या अटीवर आघाडीशी प्रस्ताव सादर करून चर्चा करावी असे मत दिलीप पनकुले ह्यांनी सेंटर पॉईंट, रामदासपेठ येथील कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त केले.

        भारतीय जनता पक्षाचा निवडणुकीत पराभव करावयाचा असल्यास समाविचारी पक्ष एकत्र लढण्याची गरज आहे. ह्या बाबत आपण पुढाकार घेऊन आघाडी घडवून आणावी असेही मत दिलीप पनकुले ह्यांनी व्यक्त केले. नागपूर स्तरावर ह्या वाटाघाटी शक्य नसून वरच्या स्तरावरच ह्याचा निर्णय होऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षाला यश मिळण्याकरिता व पक्ष संघटना भविष्यात मजबूत करण्याकरिता वरच्या स्तरावरच पाऊले उचलली गेली पाहिजे. जर हे शक्य होऊ शकले नाही तर स्वबळावरच निवडणुकीची तयारी करावी लागेल, असे प्रतिपादन दिलीप पनकुले यांनी केले. ह्या बाबत संपर्क प्रमुख आमदार दिलीप वळसे पाटील, मा. गृहमंत्री व खासदार प्रफुल पटेल यांनासुद्धा अवगत करण्यात आले.

        ह्या प्रसंगी माजी आमदार दीनानाथ पडोळे,  प्रदेश सेवादल अध्यक्ष जानबा मस्के, प्रदेश उपाध्यक्ष बजरंगसिंह परिहार उपस्थित होते. #ncp #maharashtra #sharadpawar #shivsena #congress #ajitpawar #politics #supriyasule #india #bjp #rohitpawar #ncpmaharashtra #sharadpawarspeaks #ncpspeaksofficial #mumbai #pune #ajitpawarspeaks #marathi #ajitpawarfc #ajitdada #uddhavthackeray #ncpspeaks #pawarsaheb #saheb #baramati #rohitpawarspeaks #mahavikasaghadi #inc #sharadpawarfc #nationalistcongressparty