हुडकेश्वरच्या त्या नाल्यावरील पूलाने लावली "ढूंगणाची" वाट - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

बुधवार, जुलै २०, २०२२

हुडकेश्वरच्या त्या नाल्यावरील पूलाने लावली "ढूंगणाची" वाटनागपूर/खबरबात:
नागपूर येथील पिपळा फाटा परिसरातील हुडकेश्वर रोड येथील नाल्यावरील पूलामुळे हुडकेश्वर वासी त्रस्त झाले आहेत.मागील दोन वर्षापासून या पूलाचे बांधकाम हे थंड बस्त्यात सुरू असल्याने याचा त्रास तेथील हजारो नागरिकांना सहन करावा लागत आहे. या पुलावरून जातांना ढुंगन आणि कमरेचे हाड हे शरीरासाठी त्रासदायक ठरू लागले आहे.२ वर्षापेक्षा अधिकचा काळ लोटून गेला मात्र हुडकेश्वर वासियांचे दुःख कोणताच लोकप्रतिनिधी समजू शकत नसल्याने आता येणाऱ्या काळात नगरसेवकांना नागरिक चांगलाच जाब विचारणार आहे. 
या पुलाचे काम दोन दिवसासाठी चालू तर दोन महिन्यांसाठी बंद अशा पद्धतीने होत असल्याने दोन वर्षापासून या पूलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही.त्यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. सदर पुलावर मोठ मोठे खड्डे पडले असून बाजूच्या नवीन तयार होणाऱ्या पूलाच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेला काँक्रेट देखील बाजूच्या वाहतूक सुरू असलेल्या पुलावर पडल्याने पुलावर मोठ मोठे घातक (टेकाळ) ब्रेकर्स तयार झालेले आहे.

 त्यामुळे योग्यरीत्या पुलाचे काम होत नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे आता त्याच पुलावर दररोज अपघात होत आहेत. याच परिसरातील ये जा करणारे बुजरूक,वयोवृद्ध,जेष्ठ नागरिक त्या पुलावर दररोज पडून जखमी होत आहेत. मात्र याकडे पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.त्यामुळे तात्काळ याची दखल घेत पूलाचे काम पूर्ण करण्यात यावे व खड्डे बुजवून मार्ग सुरळीत करण्यात यावा.अशी विनंती नागरिक करत आहेत.

Hudkeshwar Road in Pipla Phata area of ​​Nagpur