रविवार, जुलै १०, २०२२
पुन्हा एकदा महाराष्ट्रात भूकंप घडण्याची शक्यता
आमदारांच्या अपात्रतेबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा उद्याचा निर्णय घटनेनुसार आणि कायद्याला धरून असणे अपेक्षित आहे. उद्याच्यानिकालावर महाराष्ट्रसह देशाचं लक्ष आहे. म्हणूनच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबविला आहे. जर उद्याचा निर्णय सरकारच्या विरोधात गेलातर पुन्हा एकदा महाराष्ट्रात भूकंप घडण्याची शक्यता आहे, अशी फेसबुक पोस्ट विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
बहुमत चाचणीला मी व पक्षातील इतर १० सहकारी आमदार बहुमत चाचणीच्या दिवशी 9 मिनिट उशिरा पोहोचलो. आम्हाला वाटले होतेकी अगोदर चर्चा होईल नंतर मतदान होईल... मात्र, आमची अनुपस्थिती लक्षात घेऊन लगेच पोल मागितला.
आम्हाला जाणून-बुजून हे करायचे असते तर आम्ही बहुमत चाचणीच्या दिवशी विधान भवनात गेलोच नसतो. कोणी ही आमच्या बद्दलसंभ्रम ठेऊ नये. आदल्या दिवशी अध्यक्ष पदासाठी ही सरकारकडे प्रचंड बहुमत (164 ) होते. त्यामुळे आम्ही बहुमत चाचणीच्या दिवशीगेलो काय आणि नाही गेलो काय, निकालावर काही परिणाम होणार नव्हते.
ओबीसींचा डेटा गोळा करण्यासाठी मध्यप्रदेशात जी पद्धत वापरली गेली, तीच पद्धत आपण अवलंबिली आहे. त्यामुळे जर मध्यप्रदेशचेअहवाल सर्वोच्च न्यायालयात मान्य होत असेल तर महाराष्ट्राचे अहवाल ही मान्य व्हावे असे आम्हाला वाटते. बांठिया समितीचा अहवालसरकारकडे पोहोचला आहे. 12 तारखेला जर महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालयात गेला तर जाहीर झालेल्या निवडणुका थांबतील काहे सांगता येत नाही.. मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको अशी आमची भूमिका आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
Maharashtra political
Vijay wadettiwar
Eknath Shinde
Devendra fadnav
Sudhir mungantiwar
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
